मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Urmila Nimbalkar : उर्मिलाने मुलाच्या वाढदिवशी वर्षभराची जर्नी केली शेअर; जंगी सेलिब्रेशनाचा भावनिक Video

Urmila Nimbalkar : उर्मिलाने मुलाच्या वाढदिवशी वर्षभराची जर्नी केली शेअर; जंगी सेलिब्रेशनाचा भावनिक Video

मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि युट्युबर अशी ओळख असलेली उर्मिला निंबाळकर सतत चर्चेचा विषय ठरत असते. ती तिच्या नवनवीन युट्युब व्हिडीओंनी प्रेक्षकांचं मन जिंकत असते. नुकताच उर्मिलाच्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला.

    मुंबई, 7 ऑगस्ट : मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि युट्युबर अशी ओळख असलेली उर्मिला निंबाळकर (Urmila Nibalkar) सतत चर्चेचा विषय ठरत असते. ती तिच्या नवनवीन युट्युब व्हिडीओंनी प्रेक्षकांचं मन जिंकत असते. नुकताच उर्मिलाच्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. उर्मिलाचा लेक अथांग यांच्यावरही उर्मिलाची चाहते मंडळी खूप प्रेम करत असतात. अशातच उर्मिलानं तिच्या युट्युबला अथांगच्या पहिल्या वाढदिवस सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या चाहतेमंडळीचं लक्ष वेधून घेत आहे. उर्मिलानं तिच्या युट्युब व्लॉगमध्ये अथांगच्या जन्माच्या आधीपासून तर आता तो एक वर्षाचा होईपर्यंतचा संपूर्ण प्रवास शेअर केला आहे. यामध्ये तीनं अनेक आठवणी शेअर केल्या आहेत. अनेक भावूक क्षण, आनंदी क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यामध्ये उर्मिलानं अथांगचे जन्मल्यापासून आत्तापर्यंतचे सर्व फोटो शेअर केले आहेत. सोबतच तिनं कुटुंब आणि सगळ्यांसाठी अथांगचा पहिला वाढदिवस किती खास आणि महत्त्वाचा आहे हेदेखील सांगितलंय. सगळ्या प्रेक्षकांनी दिलेल्या भरभरुन प्रेमासाठी उर्मिलानं सगळ्यांचं आभार मानले आहेत. हेही वाचा -  Friendship Day चं औचित्य साधत परीनं मित्रासोबतचा खास VIDEO केला शेअर उर्मिला ही मराठीमधील अगदी बोटावर मोजता येणाऱ्या युट्युबरपैकी एक असून तिच्या चॅनेलला नेहमीच भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतो. नेहमीच आनंदी, प्रसन्न आणि टवटवीत असणाऱ्या उर्मिलाचं आयुष्य अथांग आल्यापासून किती बदललं हे तिच्या युट्युब व्हिडीओवरुन आपण वेळोवेळी पहातच असतो. अथांगच्या वाढदिवसासोबत ती तिचा मातृत्त्वाचाही वाढदिवस साजरा करत आहे. दरम्यान, उर्मिला निंबाळकरने दिया और बाती हम, मेरी आशिकी तुम से ही, एक तारा, दुहेरी अशा मालिकातून अभिनय केला आहे. याशिवाय ती आता प्रसिद्ध युट्युबर बनली आहे.
    Published by:Sayali Zarad
    First published:

    Tags: Birthday celebration, Marathi entertainment, Social media, Youtube

    पुढील बातम्या