मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Rakshabandhan 2022 : संपूर्ण देशाचे रक्षण करण्याऱ्या IPS भावाबरोबर उर्मिलानं साजरी केलं रक्षाबंधन; दिल्या हटके शुभेच्छा

Rakshabandhan 2022 : संपूर्ण देशाचे रक्षण करण्याऱ्या IPS भावाबरोबर उर्मिलानं साजरी केलं रक्षाबंधन; दिल्या हटके शुभेच्छा

Urmila Nimbalkar with brother

Urmila Nimbalkar with brother

उर्मिलाला गेल्या वर्षी ओढवलेल्या एका कठीण प्रसंगामुळे भावाला रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधता आली नव्हती. पण तिने या वर्षी भावासोबत उत्साहात रक्षाबंधन साजरे केले आहे.

  मुंबई, 11 ऑगस्ट : आज रक्षाबंधनाचा सण म्हणजे बहीण भावाचं नातं साजरं  करण्याचा दिवस.  बहीण-भावांमधील प्रेम वृद्धिंगत करणारा आजचा हा दिवस आहे.  श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याचा हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते, रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे. मराठी चित्रपटसृष्टीत अशी एक अभिनेत्री आहे जिच्या भावाने केवळ तिचेच रक्षण नाही तर पूर्ण देशाचे रक्षण करण्याचा विडा  उचलला आहे. ही अभिनेत्री म्हणजेच  उर्मिला निंबाळकर. उर्मिलाचा मोठा  भाऊ  वैभव निंबाळकर हे आयपीएस आहेत. उर्मिलाने आज रक्षाबंधनाच्या दिवशी एक स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. उर्मिला निंबाळकर प्रसिद्ध अभिनेत्री आणि सोबतच यु-ट्युबर देखील आहे. तिचे सोशल मीडियावर प्रचंड फॉलोअर्स आहेत. ती सोशल  मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घडामोड चाहत्यांसोबत शेअर करत असते. उर्मिलाने आज भावासोबतचा फोटो शेअर करत रक्षाबंधनाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहे.  तिने सोशल मीडियावर तिचा आणि तिच्या भावाचा राखी बांधतानाच  फोटो शेअर करत त्याला 'रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वाना अथांग शुभेच्छा' असं छान  कॅप्शन लिहिलं आहे. या कॅप्शनमध्ये गंमत म्हणजे उर्मिलाच्या मुलाचं नाव अथांग असं आहे. तिने मुलाच्या नावाचा उल्लेख करत शुभेच्छा दिल्या आहेत.
  उर्मिला निंबाळकरने  पहिला वाढदिवस साजरा केला. पण  मागच्या वर्षी याच  काळात उर्मिलाला एका कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले होते.  ते म्हणजे तिचा मोठा भाऊ आयपीएस वैभव निंबाळकर हे आसाम- मिझोरम सीमाभागात ड्युटीवर असताना पायाला गोळी लागून गंभीर जखमी झाले होते. उर्मिलाने तिच्या सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली होती. त्या घटनेलाही एक वर्ष पूर्ण झाले आहे. हेही वाचा - Rinku Rajguru च्या भावाला पाहिलंत का?; राखीच्या दिवशी शेअर केला खास PHOTO उर्मिलाने नुकताच याविषयी एक व्हिडीओ शेअर करत या कटू आठवणींना उजाळा दिला आहे.  भावाच्या जीवावर बेतलेला प्रसंग त्यातच मुलाचा झालेला जन्म या सगळ्याला ती धीराने सामोरे गेली. त्याबद्दल चाहते नेहमीच तिचं  कौतुक करतात. उर्मिलाला गेल्या वर्षी या प्रसंगामुळे भावाला रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधता आली नव्हती. पण तिने या वर्षी भावासोबत उत्साहात रक्षाबंधन साजरे केले आहे. सोशल मीडियावर उर्मिला निंबाळकर सोबतच तिच्या मुलाचेही खूप मोठे फॅन्स आहेत. आजही तिने तिचा लेक अथांग आणि त्याची लाडकी बहीण उन्मनी यांचा राखी बांधतानाचा क्युट फोटो शेअर केला आहे. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत उर्मिला आणि तिच्या लेकाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले आहेत.
  Published by:Nishigandha Kshirsagar
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या