मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Urmila Nimbalkar: नाचण्याची संधी कधीही सोडू नये! फुल्ल जोशात उर्मिलानं धरला गाण्यावर ठेका; Video व्हायरल

Urmila Nimbalkar: नाचण्याची संधी कधीही सोडू नये! फुल्ल जोशात उर्मिलानं धरला गाण्यावर ठेका; Video व्हायरल

सगळ्यांना टिप्स आणि ट्रिक्स सांगणारी उर्मिला मात्र यावेळी नव्या रुपात समोर आली आहे. उर्मिलाच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सगळ्यांना टिप्स आणि ट्रिक्स सांगणारी उर्मिला मात्र यावेळी नव्या रुपात समोर आली आहे. उर्मिलाच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सगळ्यांना टिप्स आणि ट्रिक्स सांगणारी उर्मिला मात्र यावेळी नव्या रुपात समोर आली आहे. उर्मिलाच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  मुंबई, 16 ऑगस्ट: अभिनेत्री आणि आता यूट्यूबर म्हणून आपली नवी ओळख बनवणारी सगळ्यांची पाव्हनी म्हणजे उर्मिला. आपल्या सहज सुंदर बोलण्याच्या आणि सांगण्याच्या शैलीनं उर्मिलानं सगळ्यांची मनं जिंकली. उर्मिला आज अनेक मुलींसाठी, आयांसाठी इन्स्पिरेशन बनली आहे. तिच्या लहान लहान टिप्स देखील अनेक गोष्टी शिकवून जातात. उर्मिलानं  तिच्या याच गुणांमुळे आज युट्यूबर 8 लाख सब्स्क्राइबर्सचा टप्पा पार केला आहे आणि मुख्य म्हणजे स्वत:चा स्टुडिओ बनवणारी मराठीतील पहिलीच युट्यूबर ठरली आहे.  सगळ्यांना टिप्स आणि ट्रिक्स सांगणारी उर्मिला मात्र यावेळी नव्या रुपात समोर आली आहे. एरवी मस्त मस्त स्टायलिश कपडे घालून पोझेस देणारी उर्मिला यावेळी मात्र बिधास्त नाचताना दिसत आहे. उर्मिलाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उर्मिलानं अथांगच्या जन्मानंतर स्वत:ला चांगलंच फिट ठेवलं आहे. तिच्या आरोग्याकडे ती विशेष लक्ष देताना दिसते. उर्मिलानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती सध्या इन्स्टाग्रामवर ट्रेंड होणाऱ्या एका कमाल म्युझिकवर नाचताना दिसत आहे.  सोबत तिनं सर्वांना एक आठवण ही करुन दिली आहे तिनं म्हटलंय, 'फक्त एक आठवण. आयुष्य खूप सुंदर आहे आणि नाचण्याची किंवा त्याचा आनंद घेण्याची संधी कधीही सोडू नये'. हेही वाचा - Kiran Mane : 'माझ्याबाबतीतलं तिचं मत हलक्यात घेन्यासारखं नाय'; जुन्या वादावर पुन्हा व्यक्त झाले किरण माने
  उर्मिलाच्या या व्हिडीओमध्ये ती कमाल एनर्जीनं नाचताना दिसतेय. तिचा फिटनेसही पाहायला मिळतोय. तिच्या लाडक्या मंडळींनीही म्हणजेच तिच्या चाहत्यांनीही व्हिडीओला पसंती देत कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युझरनं म्हटलंय,  'बिंधास्त उर्मिला. लोकांचं काय ग ताई जगणाऱ्याला जगू देत नाहीत अन मारणाऱ्याला मरू देत नाहीत. ज्यात आपला निखळ आनंद आहे त्या गोष्टी आपण करायलाच हव्यात. तेवढं स्वातंत्र्य आहे आपल्याला आपलं आहे आयुष्य. लोकांच्या मालकीचं नाही.  तर दुसऱ्या एका युझरनं उर्मिला कमाल फिटनेस पाहून तू काही दिवसांनी अथांगची मोठी बहिण वाटशील असं म्हटलं आहे. उर्मिलाचा या आधीही एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात ती तिचा नवरा सुकीर्तबरोबर बर्थ डे पार्टीमध्ये डान्स करताना दिसत होती. तिच्या भाचीचा म्हणजेच उन्मनीच्या वाढदिवसात सुकीर्त आणि उर्मिलानं धम्माल केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा उर्मिलाला थिरकताना पाहून तिच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केलाय.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या