मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Urmila nimbalkar: 'आई झाल्यावर स्त्रीने सुंदर-मादक दिसायचंच नाही?',नेटकऱ्यांवर भडकली मराठमोळी अभिनेत्री

Urmila nimbalkar: 'आई झाल्यावर स्त्रीने सुंदर-मादक दिसायचंच नाही?',नेटकऱ्यांवर भडकली मराठमोळी अभिनेत्री

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि युट्युबर उर्मिला निंबाळकर नेहमीच आपल्या नवनवीन पोस्टमधून चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि युट्युबर उर्मिला निंबाळकर नेहमीच आपल्या नवनवीन पोस्टमधून चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि युट्युबर उर्मिला निंबाळकर नेहमीच आपल्या नवनवीन पोस्टमधून चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 14 ऑगस्ट-   प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि युट्युबर उर्मिला निंबाळकर नेहमीच आपल्या नवनवीन पोस्टमधून चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. बऱ्याचवेळा आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून ती विविध विषयांवर आपलं मत व्यक्त करत असते. तर अनेकवेळा ती नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर देतानाही दिसते. सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या उर्मिला निंबाळकरची नवी पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. पाहूया अभिनेत्रीनं नेमकं काय म्हटलंय. उर्मिला निंबाळकर ही मराठी युट्युबर आहे.जवळजवळ चार वर्षे झालं तिने या चॅनेलची सुरुवात केली आहे. नुकतंच अभिनेत्रीनं आपल्या स्वतःचा स्टुडिओदेखील सुरु केला आहे. युट्युब चॅनेल असो किंवा इन्स्टाग्राम उर्मिला नेहमीच विविध विषयांवरील माहिती देणारे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. अभिनेत्री आपल्या पोस्ट आणि व्हिडीओमधून मुली आणि स्त्रियांसाठी हेल्थ, मेकअप, फॅशन,मदरहूड अशा विविध विषयांवरील टिप्स देत असते. सोबतच अभिनेत्री आपले बोल्ड आणि बिनधास्त फोटो शेअर करत सर्वांचं लक्ष वेधत असते. दरम्यान अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले काही साडीतील फोटो शेअर केले आहेत. यामध्ये उर्मिला इंडो वेस्टर्न अंदाजात दिसून येत आहे. अभिनेत्रीने ऑफ शोल्डर ब्लाउज आणि साडीमध्ये अगदी मादक अशा पोज दिल्या आहेत. आई होऊनसुद्धा उर्मिला अतिशय फिट आणि हॉट दिसत आहे. परंतु काही नेटकऱ्यांना उर्मिलाचा हा अंदाज अजिबात रुचलेला दिसत नाहीय. त्यामुळे त्यांनी उर्मिलाला नकारत्मक अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्रीने या प्रतिक्रिया नि ते फोटो शेअर करत नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
(हे वाचा: अभिनेत्रीनं आपलं स्वप्न केलं साकार; ठरली स्वतः चा स्टुडिओ थाटणारी पहिली मराठी युट्यूबर) उर्मिला निंबाळकर पोस्ट- आपल्या मनात उगाचच आई झाल्यावर स्त्रीने कधीच सुंदर-मादक दिसायचच नाहीअसा समज झालाय. आईला ही कतृत्व गाजवून पैसे कमवावेसे वाटतात, आईलाही आई झाल्यानंतरही सुंदर-सेक्सी दिसावं वाटतं, म्हणूनच वजन कमी करुन, आपल्या पुर्वीच्या ताकदीनं, जोमानं पुन्हा काम करावसं वाटतं. बाळ, घर, करिअर, marital and sexual life heathy व्हावी असं वाटतं आणि सौंदर्यानं भरलेलं तरीही delivery नंतर recover होणाऱ्या शरीराची काळजी तिला घ्यावीशी वाटते.खरंतर ही काळजी तिच्या घरातील सर्वांनीच घ्यायला हवी! ही काळजी घेताना पुन्हा एकदा आत्मविश्वास कमावणे महत्त्वाचे. आणि इतरांनी तिला या सगळ्या roles मधून जाताना साथ द्यायला हवी! या पोस्टचा उद्देश trollers ना धडा शिकवणं नसून,नविन विचारांना वाट दाखविण्याचा आहे.''
First published:

Tags: Entertainment, Instagram post, Marathi actress, Marathi entertainment

पुढील बातम्या