राजकारणात येताच उर्मिला मातोंडकरवर व्यक्तिगत हल्ला, नवऱ्याला म्हणतायेत पाकिस्तानी

राजकारणात येताच उर्मिला मातोंडकरवर व्यक्तिगत हल्ला, नवऱ्याला म्हणतायेत पाकिस्तानी

उर्मिलाचा नवरा मोहिसन अख्तर मीर हा काश्मीरमधील मोठा व्यावसायिक आणि मॉडेल आहे. त्याचा कपड्यांचा व्यवसाय आहे.

  • Share this:

मुंबई, २९ मार्च- बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पक्षाने तिला उत्तर मुंबईचं तिकीटही दिलं. आता उर्मिलाला तिकीट मिळताच तिच्याविरोधातल्या अफवांना उधाण आलं आहे. काही फेसबुक आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये उर्मिलाच्या पतीवरून तिच्यावर निशाणा साधण्यात येत आहे. उर्मिलाचा पती मूळचा पाकिस्तानी असून तो काश्मिरात मोठा व्यावसायिक असल्याचा मेसेज फेसबुक आणि व्हॉट्सअपवर सध्या फिरत आहे.
 

View this post on Instagram
 

Burn all negativity Bring all positivity in life Celebrate this holi with vibrant colours ...Happy Holi lovely people #happy #colours #madness #fun #family #stud #romeo #me #hubby N #lotsofcolours And Happy Navroz to some of you too ❤️


A post shared by Urmila Matondkar (@urmilamatondkarofficial) on

सोशल मीडिया ग्रुपमध्ये उर्मिला आणि तिच्या नवऱ्याचे फोटो शेअर करत त्याखाली ‘फार कमी लोकांना माहीत आहे की उर्मिलाने पाकिस्तानी व्यक्तिशी लग्न केलं,’ अशा पद्धतीचा मेसेज व्हायरल केला जात आहे. काहींनी तर उर्मिलाने धर्म बदलल्याचेही लिहिले आहे.

४२ वर्षीय उर्मिलाने तिच्याहून नऊ वर्ष लहान असलेल्या मॉडेल आणि व्यावसायिक प्रियकर मोहसिन मीर अख्तरशी लग्न केलं. उर्मिलाचा नवरा मोहिसन अख्तर मीर हा काश्मीरमधील मोठा व्यावसायिक आणि मॉडेल आहे. त्याचा कपड्यांचा व्यवसाय आहे. २०१६ मध्ये उर्मिलाने अगदी मोजक्यांच्या मित्र- परिवाराच्या उपस्थितीत लग्न केलं.
 

View this post on Instagram
 


A post shared by Urmila Matondkar (@urmilamatondkarofficial) on

मीडिया रिपोर्ट्सनुसार वयाच्या २१ व्या वर्षी मोहसिन मुंबईत मॉडेलिंगसाठी आला होता. त्याने झोया अख्तरच्या लक बाय चान्स सिनेमात एक छोटेखानी भूमिकाही केली. २०१४ मध्ये फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या भाचीच्या लग्नात उर्मिला आणि मोहसिनची पहिल्यांदा भेट झाली. मोहसिन अख्तरने स्पष्ट केलं होतं की, लग्नानंतर उर्मिलाने तिचं नाव आणि धर्म दोन्ही बदलले नाहीत.

उत्तर मुंबई : उर्मिलाच्या राजकीय अंदाजासमोर विरोधकही धास्तावले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 29, 2019 09:40 PM IST

ताज्या बातम्या