मुंबई, 04 फेब्रुवारी : 90च्या दशकातील सर्वांची लाडकी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर. रंगिला गर्ल म्हणून उर्मिला प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. अभिनय आणि वैयक्तिक आयुष्यामुळे उर्मिला कायमच चर्चेत राहिली. 1980साली उर्मिला मातोंडकर 'कलयुग' सिनेमातून बालकलाकार म्हणून समोर आली. त्यानंतर शेखर कपूरच्या 'मासून' सिनेमातून तिच्या बॉलिवूड प्रवासाला खऱ्या अर्थानं सुरूवात झाली. उर्मिला आज तिचा 49वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनय आणि आता राजकारणात सक्रीय झालेल्या उर्मिलाची संपत्ती नेमकी किती आहे पाहूयात.
उर्मिलाचं शालेय शिक्षण मुंबईत झालं. तिनं रुपारेल कॉलेजमधून फिलोसॉफीमध्ये शिक्षण घेतलं. 1992मध्ये शाहरुखच्या चमत्कार सिनेमात उर्मिला दिसली. त्यानंतर 1995मध्ये राम गोपाल वर्माच्या 'रंगीला' सिनेमानं उर्मिलाला ओळख दिली. त्यानंतर 'सत्या', 'जुदाई', 'चमत्कार', 'कुंवारा', 'जानम' सारख्या सिनेमात तिनं तिच्या अभिनयाची छाप पाडली.
हेही वाचा - राजकारणात येण्याआधी 'असा' होता उर्मिला मातोंडकर यांचा लूक
'रंगीला' या सिनेमानं उर्मिला तिची ओळख दिली मात्र याच सिनेमामुळे तिचं वैयक्तिक आयुष्य चर्चेत आलं. रंगीला सिनेमावेळी दिग्दर्शक रामगोपाल वर्माबरोबर उर्मिला रिलेशनमध्ये असल्याचं म्हटलं जातं. राम गोपाल वर्मा हे त्यावेळंच वादग्रस्त्र नाव होतं. अनेकांशी त्याचं भांडण होतं. उर्मिला त्याच्याबरोबर रिलेशनमध्ये असल्याचं तिलाही कोणी काम देईना. राम गोपालबरोबर ब्रेकअप नंतर उर्मिलाला कोणीही विचारायला तयार नाही. राम गोपाल वर्मामुळे तिच्या करिअरचं नुकसान झाल्याचं सांगितलं जातं.
View this post on Instagram
उर्मिलानं 2016साली तिच्याहून 9 वर्षांनी लहान असलेल्या बिझनेसमॅन मोहसीन अख्तर मीरबरोबर लग्न केलं. त्यानंतर 2019मध्ये उर्मिलानं राजकारणात प्रवेश केला. 2019च्या लोकसभा निवडणूक उर्मिलाला काँग्रेस पक्षानं उत्तर मुंबईतून उमेदवारी दिली. निवडणूकींच्या वेळी आलेल्या माहितीनुसार, उर्मिला एकूण 68.28 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.
उर्मिलाकडे 40.93 कोटींची जंगम तर 27.34 स्थावर मालमत्ता आहे. असं असलं तरी उर्मिलावर तब्बल 32 कोटींचं कर्ज आहे. उर्मिलाला दागिन्यांचं भयंकर वेड आहे. तिच्या 1 कोटींहून अधिक रुपयांचे दागिने आहेत. डायमंडचे दागिने तिला सर्वाधिक आवडतात. त्याचप्रमाणे 1 लाखांहून अधिक रुपयांचे गोल्डन कॉइन तिच्याकडे आहेत. तसंच 17 लाखांहून अधिक सोन्याचे दागिने आहेत.
दरम्यान उर्मिलाचा नवरा मोहसीन अख्तर मीर हा पेशानं बिझनेमन आहे. त्याची एकूण संपत्ती 32.35 कोटींची जंगम तर 3 लाखांची स्थावर मालमत्ता आहे. दोघांकडे महागड्या आहेत. उर्मिलाकडे एक मर्सिडिज आणि 2 इतर ब्रँडच्या कार आहेत. तर मोहसीनकडे एक टाटा स्टॉर्म कार आणि एकक रॉयल एनफिल्ड डेजर्ड स्टॉर्म आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News