'उरी' फेम विकी कौशल भाड्याच्या घरात साजरा करणार वाढदिवस ?

'उरी' फेम विकी कौशल भाड्याच्या घरात साजरा करणार वाढदिवस ?

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल उद्या 16 मे ला 31 वा वाढदिवस साजरा करत आहे.

  • Share this:

मुंबई, 15 मे : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल उद्या 16 मे ला 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. मात्र यंदा विकी आपला वाढदिवस एक भाड्याच्या घरात साजरा करत आहे. उरी सिनेमानंतर स्वतःचा वेगळा चाहता वर्ग निर्माण करणारा अभिनेता विकी कौशल यंदा त्याचा वाढदिवस न्यूयॉर्कमध्ये साजरा करत आहे आणि यासाठी त्यानं न्यूयॉक्रमध्ये एक कंट्रीसाइड व्हिला बुक केला आहे. याठीकाणी विकी जवळपास 2 आठवडे राहणार असून त्याच्यासोबत त्याचे कॉलेजचे  मित्र त्याच्यासोबत असणार आहेत. विकीचे हे सर्व मित्र बॉस्टन आणि न्यूजर्सीमध्ये राहतात. त्यामुळे ते विकीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एकत्र भेटणार आहेत.

विकीनं खरंतर मित्रासोबत वेळ घावण्यासाठी मागच्या महिन्यातच 2 आठवड्यांचा ब्रेक घेणार होता. मात्र शूटिंगच्या व्यस्त वेळापत्राकामुळे त्याला ते शक्य झालं नाही. पण आता त्याला काही दिवसांची सुट्टी मिळाली असून  हा सर्व वेळ तो आपल्या मित्रांसोबत घालवणार आहे. मागच्या काही दिवसांपासून विकी त्याच्या सोशल मीडिया अकाउंट एकामागोमाग एक फोटो पोस्ट करत आहे. यावरुनच तो या ठिकाणी खूप एंजॉय करत आहे हे दिसतंय. उद्या वाढदिवस साजरा केल्यानंतर विकीनं नो मोअर स्लिप हा सिनेमा पाहण्याचाही प्लान बनवला आहे. पण न्यूयॉर्कमधून परतल्यावर मात्र विकी लगेचच उद्धम सिंह सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. याशिवाय तो लवकरच करण जोहरच्या 'तख्त' सिनेमात दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

Not so vanilla... 😋

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

'गँग्स ऑफ वासेपुर' या सिनेमातून असिस्टंट डायरेक्टर म्हणून बॉलिवूड करिअरची सुरुवात करणाऱ्या विकी कौशलनं 'लव शव ते चिकन खुराना', 'गीक आउट' आणि 'बॉम्बे वेल्वेट' या सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र विकीला खरी ओळख मिळाली ती 2015मध्ये आलेल्या 'मसान' या सिनेमातून. यानंतर मात्र विकीच्या करिअरनं चांगलाच वेग घेतला. त्यानं 'राजी', 'लव पर स्वेयर फूट', 'संजू', 'मनमर्जियां', 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' अशा एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमात काम केलं. त्याच्या उरी सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. त्याचा हा सिनेमा जवळपास 4 आठवड्यांहून जास्त काळ थिएटरमध्ये होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

शाहरुख खानसोबत केलं होतं पदर्पण, आता बॉलिवूडमधून गायब आहेत 'या' 14 अभिनेत्री

दिशा पाटनीने केलं असं काही की लोक म्हणाले, ‘हा तर टायगरचाच परिणाम...’

डोळ्यांसमोर दोन वर्षांच्या मुलीला तडफडत मरताना पाहिलं, अभिनेत्यानं शेअर केलं दुःख

First published: May 15, 2019, 5:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading