चित्रीकरणादरम्यान विकी कौशलचा अपघात, फ्रॅक्चरसह चेहऱ्यावर १३ टाके

चित्रीकरणादरम्यान विकी कौशलचा अपघात, फ्रॅक्चरसह चेहऱ्यावर १३ टाके

गुजरातमध्ये एका सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान, त्याच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. विकी एक अॅक्शन सीक्वेन्स शूट करत होतो तेव्हा हा अपघात झाला.

  • Share this:

मुंबई, २० एप्रिल- बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा अपघात झाला असून यात त्याला जबर दुखापत झाली आहे. गुजरातमध्ये एका सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान, त्याच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. विकी एक अॅक्शन सीक्वेन्स शूट करत होतो तेव्हा हा अपघात झाला. सिनेव्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून यासंदर्भात माहिती दिली. तरण म्हणाले की, भानुप्रताप सिंह यांचं दिग्दर्शन असलेल्या सिनेमाचं चित्रीकरण करत असताना विकीच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून चेहऱ्यावर १३ टाके घालण्यात आले आहेत.

एक अॅक्शन सीन शूट करत असताना त्याच्या चेहऱ्यावर दरवाजा पडला. ज्यामुळे चेहऱ्याचं हाड (चीकबोन) फ्रॅक्चर झालं आहे. १८ एप्रिलला हा अपघात घडला असून आता हे प्रकरण समोर येत आहे. भानुप्रताप यांचा हा हॉरर सिनेमा एका जहाजा संदर्भात आहे जे समुद्राच्या किनाऱ्यावर उभं असतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच दिवसांपासून सिनेमाची संपूर्ण टीम गुजरातच्या शिप ब्रेकिंग यार्ड येथे सिनेमाचं चित्रीकरण करत आहे.

कसा झाला अपघात-

गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठं शिप ब्रेकिंग यार्ड आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विकीला धावत जाऊन एक दरवाजा उघडायचा होता. पण काही तांत्रिक अडचणींमुळे तो दरवाजा विकी कौशलवरच पडला.

कुठे चाललेत उपचार-

हा अपघात घडल्यावर त्याला लगेच जवळच्या स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले, ज्यानंतर त्याला विमानाने मुंबईत आणले गेले. सध्या त्याचे उपचार मुंबईतील एका खासगी रुग्णालयात सुरू आहेत. विकीला झालेली दुखापत किती गंभीर आहे आणि त्याचा चेहरा कधीपर्यंत नीट होईल याबद्दल कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

सिनेमाची स्टारकास्ट-

ज्या सिनेमाचं चित्रीकरण करताना विकीचा अपघात झाला त्याची निर्मिती करण जोहरचं धर्मा प्रोडक्शन करत आहे. विकीशिवाय या सिनेमात भूमी पेडणेकरची मुख्य भूमिका आहे. भूमीचा याआधी ‘सोनचिडिया’ सिनेमा प्रदर्शित झाला तर लवकरच ती तापसी पन्नूसोबत ‘सांड की आंख’ सिनेमात दिसणार आहे.

First published: April 20, 2019, 11:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading