मुंबई, 26 नोव्हेंबर : आपल्या अतरंगी आणि विचित्र फॅशनमुळे कायम प्रकाश झोतात असलेली उर्फी जावेद सध्या एक अडचणींत सापडली आहे. यावेळी उर्फीला तिच्या फॅशनमुळे नाही तिच्या नावामुळे अडचणींचा सामना करावा लागणार आहे. आता तुम्ही विचार करत असाल की नावामुळे कोणी अडचणीत कसं येऊ शकतं. चला तर मग पाहूया काय आहे हे नेमकं प्रकरण.
उर्फी जावेद कधीही दुबईला जाऊ शकणार नाही. यामागे तिचे कपडे नसून तिचे नाव कारण आहे. उर्फी जावेदने तिच्या पासपोर्टवर तिचे नाव बदलून फक्त उर्फी असं ठेवलं आहे. हे एकच नाव असल्यामुळे आता ती दुबईला कधीच जाऊ शकणार नाही. उर्फी जावेदने स्वतः इन्स्टाग्रामवर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.
हेही वाचा - 'लोक अंथरुणात शिरून उर्फीचे...'; चेतन भगत हे काय बोलून गेला?
उर्फीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलं, माझे अधिकृत नाव फक्त उर्फी आहे. आडनाव नसल्यामुळे आता मी दुबईला जाऊ शकत नाही. यासोबतच तिने लिहिले, 'आडनाव नसलेली व्यक्ती UAE मध्ये प्रवास करू शकत नाही.' उर्फीने काही दिवसांपूर्वी आपले नाव बदलले होते. या बदलासोबतच तिने आपल्या नावाच्या इंग्रजी अक्षरांमध्ये 'ओ' जोडले होते. हा बदलही तिने आपल्या सर्व कागदपत्रांमध्ये केला होता. उर्फी जावेदच्या पासपोर्टवर आता तिचे नवीन नाव आहे. आता हा बदल उर्फीसाठी खूप त्रासदायक ठरत असल्याचं दिसून येत आहे.
21 नोव्हेंबर रोजी, एअर इंडिया आणि एआय एक्सप्रेसने घोषणा केली की UAE इमिग्रेशन विभाग भारतीयांना त्यांच्या पासपोर्टवर एकच नाव ठेवण्याची परवानगी देणार नाही.
दरम्यान, उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक माहिती सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच तिने तिच्या लेटेस्ट लूकमुळे खूप चर्चेत आली आहे. कधी उर्फी मोबाईल फोनचा टॉप घातलेली दिसते तर कधी ती पट्टीचा ड्रेस घातलेली दिसते. प्रत्येक वेळी नवीन फॅनने उर्फी सगळ्यांना थक्क करते. त्याचवेळी उर्फी जावेदला हॉट आणि बोल्ड फोटोंसाठी ट्रोलही केलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Fashion, Urfi Javed