मुंबई, 8 जुलै : उर्फी जावेद (Urfi javed) नेहमीच निरनिराळे कपडे घालून आपल्या चाहत्यांना थक्क करते. आपल्या स्टाईल आणि कपड्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात असणारी उर्फी (Urfi javed fashion)पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. उर्फी (Urfi javed new look) तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आहे. यासोबत उर्फीनं एक हैराण करणारं मोठं वक्तव्य केलं आहे. याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
उर्फी (Urfi javed age)नुकतीच मुंबईतील अंधेरी भागात दिसली होती. तिला पाहताच चाहत्यांनी तिच्यासोबत फोटो काढायला गर्दी केली. यावेळी उर्फीनं (Urfi javed instagram)निळ्या रंगाचा वन-पीस घातला होता. या ड्रेसला काॅलरच्या खालून जाळीदार कटिंग केलेली पहायला मिळाली. तिच्या या नव्या लूकनं (Urfi javed outfit)अनेकांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या. तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी यावेळी अनेकांनी गर्दी केली. जेव्हा पापाराझीने तिला तिच्या कपड्यांबद्दल विचारले तेव्हा उर्फी म्हणाली की, 'मी एक दिवस कपडेच घालणार नाही. अरे यार चाहत्यांना सरप्राईज करावं असं काहीच माझ्या मनात नसतं. मी फक्त मला जे आवडतं तेच घालते'. उर्फीनं केलेल्या वक्तव्यानं सगळ्यांनाच हैराण करुन टाकलं. सध्या सोशल मीडियावर उर्फीनं केलेल्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.
हेही वाचा - सावत्र आई आणि भावंडांसोबत सुट्टी एन्जॉय करताहेत सारा-इब्राहिम; PHOTO पाहून सैफच्या बहिणीने केली अशी कमेंट
उर्फी जावेद सतत सोशल मीडियावर आपल्या अतरंगी लुकमुळे चर्चेत असते. बऱ्याच वेळा ती आपल्या फॅशन सेन्स आणि स्टाईलमुळे ट्रोलदेखील होत असते. परंतु या सर्वांचा उर्फीवर अजिबात परिणाम होत नाही. ती नेहमीच आपल्या अंदाजात वावरत असते. ट्रोलिंगचा स्वतःवर अजिबात परिणाम होऊ देत नाही. आतापर्यंत उर्फीनं अनेक वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत हटके कपडे बनवले आहेत. प्रत्येक वेळी ती आपल्या फॅशन सेन्समुळे नेटकऱ्यांना आश्चर्यचकित करत असते. तिच्या लूकचं अनेकजण कौतुकही करतात तर काहीजण तिला ट्रोलही करतात.
View this post on Instagram
दरम्यान, उर्फी जावेदचं नाव सर्वाधिक सर्च केलेल्या आशियाई यादीमध्ये आलं आहे. या यादीत उर्फीने कियारा अडवाणीपासून जान्हवी कपूरला मागे टाकले आहे. म्हणजेच, कियारा आणि जान्हवीपेक्षा लोकांनी इंटरनेटवर उर्फीला जास्त सर्च केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment, Fashion, Instagram, Instagram post