मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Urfi Javed: 'दीदी टेप तर लावली पण...'उर्फीच्या नव्या फॅशनमुळे पुन्हा भडकले नेटकरी

Urfi Javed: 'दीदी टेप तर लावली पण...'उर्फीच्या नव्या फॅशनमुळे पुन्हा भडकले नेटकरी

उर्फी जावेद

उर्फी जावेद

फॅशन सेन्सेशन उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी कपड्यांमुळे कायम चर्चेत असते. नवनवीन लुकने ती नेटकऱ्यांना थक्क करत असते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 3 डिसेंबर : फॅशन सेन्सेशन उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी कपड्यांमुळे कायम चर्चेत असते. नवनवीन लुकने ती नेटकऱ्यांना थक्क करत असते. अशातच उर्फीचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. नेहमीप्रमाणेच हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असून इंटरनेटचं तापमान वाढवत आहे. या व्हिडीओनं सध्या अनेकांचं लक्ष वेधलं असून तिचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. व्हिडीओमध्ये पुन्हा एकदा उर्फीची अतरंगी आणि हटके फॅशन अनेकांच्या भुवया उंचावत आहे.

उर्फी जावेदने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या लेटेस्ट लुकचा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी उर्फीने एकही कपडा न घालता अंगावर लाल रंगाचा सेलोटेम चिकटवला आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय की, उर्फीने स्वतःला जमीनीवर चिकटवून घेतलं आहे. तिने दुसरं काही घातलं नसून सेलोटेप घेऊन ड्रेस बनवला आहे. तिची ही फॅशन पाहून नेटकरी पुन्हा एकदा चक्रावले असून तिच्या व्हिडीओवर कमेंट करत तिला ट्रोल करत आहे. त्यामुळे उर्फीला नेहमीप्रमाणेच ट्रोलर्सच्या ट्रोलिंगचा सामना करत आहे.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

व्हिडीओवर कमेंट करत अनेक नेटकऱ्यांनी म्हटलं, 'दीदी टेप तर चिकटवला पण काढताना जास्त मजा येईल, तुझ्यापुढे काहीच नाही, बावळट मुलगी, असे कपडे घालून तुला काय मिळतं उर्फी, तोंडावर पण टेप लाव, ही कसली फॅशन आहे. जगातला आठवा अजुबा'. पोस्टवर अनेक कमेंट येत असल्याचं पहायला मिळतंय.

हेही वाचा -  Urfi Javed: उर्फी जावेदला 'या' ठिकाणी नो एन्ट्री! कपडे नाही तर 'हे' आहे कारण

र्फी जावेद सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक माहिती सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच तिने तिच्या लेटेस्ट लूकमुळे खूप चर्चेत आली आहे. कधी उर्फी मोबाईल फोनचा टॉप घातलेली दिसते तर कधी ती पट्टीचा ड्रेस घातलेली दिसते. प्रत्येक वेळी नवीन फॅनने उर्फी सगळ्यांना थक्क करते. त्याचवेळी उर्फी जावेदला हॉट आणि बोल्ड फोटोंसाठी ट्रोलही केलं जातं.

दरम्यान, उर्फीन एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देखील आहे. ती तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे खूप चर्चेत आहे. तिनं अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच 'बिग बॉस' सारख्या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे, परंतु तरीही ती तिच्या कामापेक्षा त्याच्या ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते.

First published:

Tags: Entertainment, Fashion, Instagram, Urfi Javed