मुंबई, 15 नोव्हेंबर : 'बिग बॉस ओटीटी'मधून लोकप्रियता मिळवणाऱ्या उर्फी जावेदने सध्या सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. उर्फी तिच्या लूकमुळे दररोज चर्चेत असते. कधी उर्फीचा फॅशन सेन्स लोकांना आवडतो, तर कधी ती ट्रोलच्या निशाण्यावर येते पण त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात ती मागे राहिली नाही. मध्यंतरी तिच्यावर एफआयआर झाल्याची बातमी होती. पण त्या व्यक्तीलाही तिने जोरदार प्रत्युत्तर दिले होते. आता 'बिग बॉस'मुले लोकप्रिय झालेलाच हिंदुस्थानी भाऊने उर्फी जावेदसोबत पंगा घेतला होता. उर्फीचा टॉपलेस व्हिडिओ समोर आल्यानंतर हिंदुस्थानी भाऊने अभिनेत्रीला सुधारण्याची धमकी दिली होती. आता उर्फीचा नवा अवतार पाहून चाहत्यांना पुन्हा हिंदुस्थानी भाऊंची आठवण झाली आहे.
सोशल मीडिया सेन्सेशन उर्फ जावेदने एक नवीन पोस्ट शेअर करून नेटिझन्सला धक्का दिला आहे. यावेळी उर्फीने कोणतेही न्यूड फोटोशूट केले नसून, तिने चक्क नववधूप्रमाणे वेषभूषा केली आहे. नेहमीच बोल्ड लूकमध्ये दिसणाऱ्या उर्फीचा हा सुसंस्कृत लूक पाहून सोशल मीडिया यूजर्स मात्र हैराण झाले आहेत. उर्फीच्या पोस्टवर अनेक युजर्स कमेंट्सचा वर्षाव करत आहे. कोणी चांगल्या कमेंट्स करतंय तर अनेकजण टोमणे मारत आहेत.
हेही वाचा - Bigg boss 16: 'तुझी आईसुद्धा...'; शालीन भानोतच्या 'त्या' वक्तव्यावर गौहर खानला राग अनावर
उर्फी जावेदने गुलाबी रंगाचा सूट घातला आहे. यासोबत उर्फीने डोक्यावर पदर घेतला आहे. केस मोकळे आहेत. या नव्या लूकमुळे उर्फीचे सौंदर्य अधिकच वाढले आहे. उर्फीच्या या नव्या लूकने नेटिझन्स आश्चर्यचकित झाले आहेत, तर तिचे चाहते मात्र खूप खुश आहेत. उर्फी जावेदचे चाहते कमेंट करून त्याचे कौतुक करत आहेत. त्याचबरोबर काही युजर्स तिला ट्रोल देखील करत आहेत. चाहत्यांना उर्फीच्या या नव्या लुकचा संबंध मात्र हिंदुस्थानी भाऊंशी जोडत आहेत.
View this post on Instagram
उर्फीच्या या पोस्टवर नेटकरी भन्नाट कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'हिंदुस्तानी भाऊचा चमत्कार पाहिला.' दुसऱ्या युजरने लिहिले, 'तू बरी आहेस का?' एकाने लिहिले की, 'हा चमत्कारापेक्षा कमी नाही.' उर्फी जावेदचे कौतुक करताना एका यूजरने कमेंट केली, 'उर्फी, हा तुझा आतापर्यंतचा सर्वात क्यूट फोटो आहे.'
दरम्यान, हिंदुस्थानी भाऊने उर्फीला ''जय हिंद, आज स्वत:ला एक मोठा फॅशन आयकॉन मानणाऱ्या उर्फी जावेदसाठी हा संदेश आहे... ही भारताची प्रथा नाही, ही आपली संस्कृती नाही. तुझ्यामुळे बहिणी-मुलींना खूप चुकीचा संदेश जात आहे. बेटी तू स्वतःला सुधार नाहीतर मी तुला सुधारेन. भाऊ म्हणून मी प्रेमाने समजावून सांगतोय.'' अशी धमकी दिली होती. तर उर्फीने देखील त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Entertainment, Fashion, Urfi Javed