मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Urfi Javed : अरे देवा! वायर आणि दगडांनंतर आता उर्फीने घडाळ्यापासून बनवला स्कर्ट; तुम्हीच बघा

Urfi Javed : अरे देवा! वायर आणि दगडांनंतर आता उर्फीने घडाळ्यापासून बनवला स्कर्ट; तुम्हीच बघा

उर्फी जावेद

उर्फी जावेद

उर्फीने आतापर्यंत वायर, दगड आणि प्लास्टिक पासून ड्रेस तयार केले होते. यावेळी तिने चक्क घड्याळांचाच वापर केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 1 ऑक्टोबर : अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. फॅशन्स सेन्स, बोल्ड लुक्स आणि हटके फॅशन सेन्ससाठी उर्फी जावेद चांगलीच ओळखली जाते. उर्फीला तर आता फॅशन आयकॉन म्हणायला सुरुवात केली आहे. प्रत्येक वेळी नवीन आणि बोल्ड लुक घेऊन उर्फी समोर येत असते. अशातच उर्फीचा नवा लुक समोर आला आहे. उर्फी जावेदला तिच्या कामासाठी जितकी पसंती दिली जाते तितकीच तिच्या लूक आणि फॅशनचीही खूप चर्चा होत असते. नुकताच उर्फी जावेदची एक सोशल मीडिया पोस्ट  तुफान व्हायरल होत आहे.

उर्फीने आतापर्यंत वायर, दगड आणि प्लास्टिक पासून ड्रेस तयार केले होते. यावेळी  तिने चक्क घड्याळांचाच वापर केला आहे. वेगवेगळे  घड्याळे वापरून तिने त्यापासून स्कर्ट तयार केला आहे. उर्फी जावेदनं नव्या लुकचा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. नुकताच उर्फी जावेदने एक सोशल मीडिया पोस्ट केली असून त्यामुळे ती चांगलीच खूप चर्चेत आली आहे. लोक तिला काय म्हणतात याची पर्वा न करता ती प्रत्येक गोष्टीमधे काहीतरी नवीन शोधून काढत असते.

हेही वाचा - VIDEO : नाटक का लांबतं?... प्रिया बापटने सांगितलेलं कारण ऐकून हसून व्हाल लोटपोट

तिने बनवलेल्या घडाळ्याच्या स्कर्टमध्ये ती चालताना दिसत आहे. 'वेळ काय झाला' असं म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. पोस्ट शेअर करताच अल्पावधीतच हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दरवेलीप्रमाणे याही वेळी तिला कौतुकसोबतच ट्रोलिंग सुद्धा सहन करावं लागत आहे.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फी ही  एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देखील आहे. ती तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे खूप चर्चेत आहे. तिनं अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच 'बिग बॉस' सारख्या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे, परंतु तरीही ती तिच्या कामापेक्षा त्याच्या ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते.दरम्यान, उर्फी जावेदनं शेअर केलेला हा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया उमटत असून लाईक्सचाही वर्षाव होत आहे. उर्फीच्या क्रिएटिव्हिटीची दाद द्यावी लागेल कारण ती कुठून काय संकल्पना घेऊन येते आणि नवनवीन कपडे बनवते कुणीही तर्क लावू शकत नाही.

First published:

Tags: Bollywood actress, Entertainment, Fashion