मुंबई, 9 डिसेंबर : आपल्या हटके फॅशनमुळे नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असणारी उर्फी जावेद एक नवीन फॅशन सेन्सेशन बनली आहे. अतरंगी फॅशन, बोल्ड लुक, रंगीबेरंगी स्टाईल, हैराण करणारे आऊट्सफीट यामुळे उर्फी कायमच इंटरनेटवर धुमाकूळ घालते. उर्फीचा कुठलाही लुक असो तो सोशल मीडियावर ट्रेंड करतोच करतो. अशातच उर्फीचा नवा हटके लुक समोर आला आहे. उर्फीने नव्या आऊटफीटमधला एक व्हिडीओ शेअर केला आहे.
उर्फीने नव्या लुकचा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय की उर्फीने तिचा लुक सायकलच्या चैनपासून बनवला आहे. यामध्ये उर्फीचा बिकीनी स्टाईल अरेबीक लुक दिसत आहे. उर्फीच्या नव्या लुकचा हा व्हिडीओ अगदी काही क्षणातच इंटरनेटवर धुमाकूळ घालत असलेला पहायला मिळत आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही येत आहे.
View this post on Instagram
'तुला हा विचार कुठुन आला, दुबई तुझ्यासाठी थांबलंय, अरे बापरे, उर्फीने माझ्या सायकलची चैन चोरली, याला म्हणतात क्रिएटीव्हिटी, पुढच्यावेळी हवेचे कपडे घाल', अशा अनेक प्रतिक्रिया उर्फीच्या व्हिडीओवर येत आहेत. उर्फी कधी कशापासून काय ड्रेस बनवले याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. प्रत्येकवेळी ती तिच्या स्टाईलने लोकांच्या भुवया उंचावते. तिची प्रत्येक स्टाईल, प्रत्येक आऊटफीट व्हायरल होतं.
दरम्यान, उर्फी एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देखील आहे. ती तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे खूप चर्चेत आहे. तिनं अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच 'बिग बॉस' सारख्या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे, परंतु तरीही ती तिच्या कामापेक्षा त्याच्या ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते.
कधी काच, प्लॅस्टिक, वर्तमानपत्र, ब्लेड, घड्याळ, वायर, खडे, फुलं, सेलोटेप, सगळ्याचं गोष्टींपासून उर्फीनं फॅशन आजमावली आहे. आणि प्रत्येक वेळी आणखी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न उर्फी करत असते. हटके अंदाज फॅशन दाखवत ती आत्मविश्वासानं मीडियासमोर येते. तिच्या चाहते मात्र तिच्या फॅशन आणि मेहनतीची दाद देताना दिसतात. उर्फी कायमच सोशल मीडियावर चर्चेच असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Fashion, Urfi Javed