मुंबई, 27 नोव्हेंबर : बिग बॉस ओटीटी फेम आणि इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद नेहमीच निरनिराळे कपडे घालून आपल्या चाहत्यांना थक्क करते. उर्फीचे अनेक फोटो व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असतात. आपल्या स्टाईल आणि कपड्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात असणारी उर्फी नेहमीच बेधडक वक्तव्यांसाठीही चर्चेत असते. उर्फीच्या फॅशनमुळे अनेकजण तिच्याविषयी काही ना काही वक्तव्य करत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी लेखक चेतन भगतनेही उर्फीच्या फॅशनवर निशाणा साधला होता. नुकतेच उर्फीने लेखक चेतन भगतने केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
उर्फीविषयी बोलताना चेतन भगतने म्हटलं होतं, 'आज तरुणाई फक्त उर्फी जावेदच्या फोटोलाच पसंती देत आहे. मुलाखतीला गेल्यावर काय बोलणार, मला उर्फीच्या सर्व ड्रेसेसची माहिती आहे. पण इथे उर्फीची चूक नाही. ती तिचं करिअर घडवत आहे. पण लोक बिछान्यात शिरून उर्फीचे फोटो बघत आहेत. उर्फीचे सगळे फोटो पाहून मी पण आज आलो आहे. आज उर्फीने दोन फोन घातले आहेत. उर्फीसारखी लोकं भेटत राहतात.' चेतनच्या या वक्तव्यावर उर्फीने सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे.
उर्फी जावेदने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिले आहे की, 'जेव्हा तुम्ही तुमच्या अर्ध्या वयाच्या मुलींना सोशल मीडियावर मेसेज केले, तेव्हा त्यांच्या कपड्यांमुळे तुमचे लक्ष विचलित झाले नाही. तुम्ही अशा लोकांपैकी एक आहात जे त्यांच्या चुकांसाठी फक्त महिलांना दोष देतात. तुमची विचारसरणी वाईट असेल तर त्यात मुलीचे कपडे खराब आहेत असे नाही. माझ्या ड्रेसिंग सेन्समुळे देशातील तरुण मुलं भरकटत चालली आहेत असं तुम्ही म्हणता, तुमचा संदेश तरुण मुलींना तर गेला नाही ना? हे खरोखरच अतिशय मूर्खपणाचे कृत्य आहे.'
'तुमच्या सारख्या मानसिकतेच्या लोकांनी बलात्काराची संस्कृतीला प्रोत्साहन देणं थांबवावे. एक माणूस चूक करतो आणि त्यासाठी स्त्रीला दोषी ठरवले जाणे ही 80 च्या दशकातील भूतकाळातील गोष्ट आहे, श्री चेतन भगत. तरूणांना बिघडवण्याबद्दल, तुमच्यासारखे लोक त्यांना शिकवत आहेत की त्यांच्या चुकांचा दोष दुसर्यावर कसा लावायचा. तुम्ही माझी नाही तर तरुणांची दिशाभूल करत आहात', असंही उर्फीने म्हटलं. यासोबत उर्फीने मीटू प्रकरणाचीही आठवण करुन दिली. तिने अनेक बातम्यांचे स्क्रीनशॉट तिच्या स्टोरीला शेअर केले.
दरम्यान, उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक माहिती सोशल मीडियावर शेअर करत असते. कधी उर्फी मोबाईल फोनचा टॉप घातलेली दिसते तर कधी ती पट्टीचा ड्रेस घातलेली दिसते. प्रत्येक वेळी नवीन फॅनने उर्फी सगळ्यांना थक्क करते. त्याचवेळी उर्फी जावेदला हॉट आणि बोल्ड फोटोंसाठी ट्रोलही केलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fashion, Urfi Javed