Home /News /entertainment /

उर्फी जावेदला हटके फॅशन पडलं महागात, मानेची झाली भलतीच अवस्था

उर्फी जावेदला हटके फॅशन पडलं महागात, मानेची झाली भलतीच अवस्था

नुकतंच उर्फीने साखळ्यांच्या बॅकलेस टॉप परिधान केला (Urfi Javed wearing heavy chains) होता. या लुकमुळे सोशल मीडियावर तिची बरीच चर्चा झाली होती.

    मुंबई, 12 मार्च-   'बिग बॉस OTT'   (Bigg Boss OTT)  मुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद (Urfi Javed)  होय.उर्फी जावेद या शोमध्ये फक्त एक आठवडाच होती. शोमधून आऊट झाली होती. मात्र या शोनंतर ती सतत चर्चेत असते. उर्फी आपल्या अभिनयापेक्षा आपल्या लुकमुळे सतत चर्चेत असते. ती दररोज हटके पोशाखातील फोटो सोशल मीडियावर शेअर करून सर्वांचंच लक्ष वेधून घेत असते. नुकतंच उर्फीने साखळ्यांच्या बॅकलेस टॉप परिधान केला  (Urfi Javed wearing heavy chains)  होता. या लुकमुळे सोशल मीडियावर तिची बरीच चर्चा झाली होती. इतकंच नव्हे तर तिला ट्रोल देखील करण्यात आलं होतं. परंतु या ड्रेसचा विपरित परिणाम तिच्या शरिरावर झाला आहे. नुकतंच उर्फी जावेदने आपल्या गळ्यात साखळ्या अडकवून टॉपलेस लुक केला होता. त्यासोबतच तिने काळ्या रंगाचा नेटेचा स्कर्ट परिधान केला होता. उर्फीच्या या हटके स्टाईलने सर्वांनाच थक्क केले होते. उर्फीने फॅशनसाठी त्या साखळ्या गळ्यात अडकवल्या होत्या. पण त्यानंतर जे घडलं ते अतिशय भयानक होतं. उर्फीचा हा हटके फॅशन सेन्स तिला चांगलाच महागात पडलेला दिसत आहे. उर्फी जावेदने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिच्या मानेवर प्रचंड रॅशेस आलेले दिसत आहेत. तिच्या मानेला ऍलर्जी झाल्याचं दिसत आहे. या फोटोवरून हे स्पष्ट होतं की उर्फीसाठी साखळीचा फॅशन महागात पडला आहे. त्यामुळेच हे विपरित घडलं आहे. आणि आता तिला खूप त्रास सहन करावा लागत आहे. उर्फीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये आफ्टर असं लिहिलं आहे. बिग बॉस OTT नंतर उर्फी जावेद प्रसिद्धीझोतात आली होती. याआधीही तिने मालिकेमध्ये काम केलं आहे. परंतु बिग बॉस OTT नंतर तिला खरी प्रसिद्धी मिळाली आहे. उर्फी जावेद सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्रामवर 2.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर तिने केवळ 325  लोकांना फॉलो केलं आहे. ती सतत आपले हटके फोटो आणि व्हिडीओ शेअर करून सर्वांनाच थक्क करत असते.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bigg Boss OTT, Entertainment, Fashion, Tv actress

    पुढील बातम्या