मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

साजिद खानची बिगबॉसमध्ये एन्ट्री; उर्फीला झोंबल्या मिर्च्या?, पोस्ट शेअर करत म्हणाली....

साजिद खानची बिगबॉसमध्ये एन्ट्री; उर्फीला झोंबल्या मिर्च्या?, पोस्ट शेअर करत म्हणाली....

उर्फी जावेद

उर्फी जावेद

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असलेला लोकप्रिय शो 'बिग बॉस' ला सुरु झाली आहे. यंदाच्या बिग बॉस 16 च्या घरात अनेक लोकप्रिय कलाकारांनी सहभाग घेतला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 6 ऑक्टोबर : बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असलेला लोकप्रिय शो 'बिग बॉस' ला सुरु झाली आहे. यंदाच्या बिग बॉस 16 च्या घरात अनेक लोकप्रिय कलाकारांनी सहभाग घेतला आहे. यातच बॉलिवूड चित्रपट निर्माता साजिद खानचाही समावेश आहे. मात्र अनेकांनी साजिदच्या सहभागावर आक्षेप नोंदवला आहे. त्याने बिग बॉस 16 मध्ये प्रवेश केल्यापासून एक ना एक त्याच्या विरोधात बोलत आहे. नुकतंच उर्फी जावेदनं साजिदच्या सहभागावर नाराजी व्यक्त केली आहे.

उर्फी जावेदने इंस्टा पोस्ट लिहून कलर्स चॅनल, बिग बॉसच्या निर्मात्यांना फटकारले आहे. MeToo च्या आरोपांनी घेरलेल्या साजिद खानला या शोचे निमंत्रण दिल्याबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे. मला या वर्षी बिग बॉसकडून ऑफर मिळाली असे नाही, परंतु मला ती ऑफर मिळाली असती तर मी ती नाकारली असती. त्याला रोज पाहून ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना काय वाटेल. याशिवाय उर्फीने जिया खानच्या बहिणीच्या विधानाचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये साजिद खानने अभिनेत्रीला तिचा टॉप आणि ब्रा काढण्यास सांगितले आहे. त्यामुळे उर्फीनं अशा वाईट व्यक्तीला बिग बॉसमध्ये घेतल्यावर नाराजी व्यक्त केलीये.

हेही वाचा -  Bigg Boss 16 ची सर्वात महागडी स्पर्धक आहे 'ही' अभिनेत्री, फी ऐकून व्हाल थक्क

'साजिद खानने जे केले त्यासाठी कधीही माफी मागितली नाही! कल्पना करा की त्याने ज्या मुलींवर अत्याचार केले त्यांना कसे वाटले असेल? पण तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण अनेक महिलांसोबत असं वागूणही तो सध्या भारतातील सगळ्यात मोठ्या शोमध्ये आहे', असंही उर्फी म्हणाली.

दरम्यान, पंजाबच्या कतरिना कैफ शहनाज गिलने बिग बॉसच्या प्रीमियर नाईटमध्ये साजिद खानला सपोर्ट केला होता, त्यामुळे लोकांनी शहनाज गिललाही ट्रोल करायला सुरुवात केलीये. साजिद खानमुळे लोकांच्या निशाण्यावर आलेल्या बिग बॉस या शोच्या टीआरपीवर त्याचा काय परिणाम होतो, हे येत्या आठवड्यात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published:

Tags: Bigg boss, Bollywood, Bollywood News, Urfi Javed