मुंबई, 24 जानेवारी : अभिनेत्री उर्फी जावेद सध्या तिच्या कपड्यांवरून सुरू झालेल्या वादामुळे चर्चेत आहे. उर्फीच्या विचित्र फॅशन स्टाइलवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्षेप घेत उर्फीची पोलिसांत तक्रार केली होती. दरम्यान उर्फी प्रकरण जरा शांत होत असताना उर्फीनं नवं ट्विट करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. उर्फीला मुंबईत भाड्यानं घर हवं आहे पण तिला ते मिळत नाहीये. मुंबईत भाड्यानं घर घेणं खूप अवघड झालं आहे असं उर्फीनं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे तिला घर का मिळत नाहीये याची कारण देखील तिनं ट्विटमध्ये सांगितली आहेत. उर्फीच्या या नव्या ट्विटनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
उर्फी सोशल मीडियावर सक्रीय असते. तिच्यावर कितीही टीका झाली. पोलिसांत तक्रार दाखल झाली तरी ती तिची विचित्र फॅशन स्टाइल सोडायला तयार नाही. उर्फी सातत्यानं व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसत आहे. नुकतंच तिनं ट्विट करत तिला मुंबईत भाड्यानं घर मिळत नसल्याची माहिती दिली आहे. उर्फीनं ट्विटमध्ये लिहिलंय, 'माझ्या कपड्यांमुळे मुस्लिम घर मालक मला घर भाड्यानं देऊ इच्छित नाहीत. तर मी मुस्लिम आहे म्हणून हिंदी घर मालक मला भाड्यानं देऊ इच्छित नाहीत. काही घर मालकांना तर मला मिळणाऱ्या राजकीय धमक्यांची समस्या आहे. आता मुंबईत भाड्यानं अपार्टमेंट शोधणं खूप अवघड झालं आहे'.
हेही वाचा - Urfi javed : सलवार कुर्ता ओढणी; ट्रेडिशनल अवतारात उर्फी गातेय भजन; पाहून तुम्हालाही बसेल धक्का
Muslim owners don’t want to rent me house cause of the way I dress, Hindi owners don’t want to rent me cause I’m Muslim. Some owners have an issue with the political threats I get . Finding a rental apartment in mumbai is so tuff
— Uorfi (@uorfi_) January 24, 2023
उर्फीच्या या ट्विटनं सर्वाचं लक्ष वेधलं आहे. या ट्विटच्या खाली एका युझरनं उर्फीसाठी केलेलं जुनं ट्विट पुन्हा शेअर केलं आहे. ज्यात असं लिहिलं आहे की, 'मला आजही उर्फीचा स्नॅपचॅट स्टेटस आठवतो. ज्यात ती बॅग घेऊन घराबाहेर पडली होती आणि तिला राहण्यासाठी घर नव्हतं. ती सांगत होती की ती जास्त भाडं देखील द्यायला तयार आहे. पण तरीही तिला कोणताही घरमालक घर द्यायला तयार नव्हता. ती आज कुठे आहे हे पाहून मला आनंद झाला आहे. पण मीडिया तिच्यासाठी केवळ फोटो काढण्यापुरते मर्यादित नाहीत'.
युझरच्या या ट्विटला उर्फीनं रिप्लाय देत म्हटलंय, 'प्रत्येकवेळी सिंगल, मुस्लिम आणि अभिनेत्रीला घर शोधणं अशक्य झालं आहे'. उर्फीच्या ट्विटनंतर अनेकांनी ट्रोल देखील केलं आहे. तर अनेकांनी तिला काही जागा देखील सजेस्ट केल्या आहेत. आता या ट्विटनंतर तरी उर्फीला मुंबईत घर भाड्यानं मिळतंय की नाही याकडे सर्वांचं लक्ष आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Urfi Javed