Home /News /entertainment /

Urfii Javed Hospitalised : उर्फीची प्रकृती बिघडल्यानं रुग्णालयात दाखल

Urfii Javed Hospitalised : उर्फीची प्रकृती बिघडल्यानं रुग्णालयात दाखल

उर्फीची तब्येत अचानक बिघडल्याने तिला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बातमीमुळे उर्फीचे चाहते चिंतेत पडले आहे.

  मुंबई, 6 ऑगस्ट : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfii Javed) स्टाइल, फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. तिच्या अफलातून फॅशनमुळे ती नेहमीच नेटकऱ्यांना थक्क करत असते. उर्फीला तर आता फॅशन आयकॉन म्हणायला सुरुवात केली आहे. प्रत्येक वेळी नवीन आणि बोल्ड लुक घेऊन उर्फी समोर येत असते. अशातच उर्फी जावेदची प्रकृती बिघडल्याची बातमी समोर आली आहे. उर्फीची तब्येत अचानक बिघडल्याने तिला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून उर्फीची तब्येत खराब होती. गेल्या काही दिवसांपासून उर्फीला उलट्यांचा त्रास होत होता. आज तिला 103 ते 104 डीग्री ताप आला, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. या बातमीमुळे उर्फीचे चाहते चिंतेत पडले आहे. ती बरी होण्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. urffi javed
  urffi javed
  प्रत्येक लुक आणि पोशाखात आत्मविश्वासानं वावरणाऱ्या उर्फीला अनेकवेळा तिच्या फॅशन सेन्समुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. उर्फीला ट्रोल केलं तरी ती त्या गोष्टीला न जुमानता पुढच्या वेळी आणखी अतरंगी लुकमध्ये येऊन चाहत्यांना धक्का देते. आपल्या बोल्डनेसमुळे सगळ्यांनाच अवाक् करणारी उर्फी जावेद सतत चर्चेत असते. आपल्या हटके, बोल्ड, अतरंगी फॅशनमुळे ती नेहमीच चर्चेचा विषय ठरते. हेही वाचा -  'जगणं हे न्यारं झालं जी'; ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधे यश नेहा सोबत घालवणार सुंदर क्षण, पाहा VIDEO दरम्यान, बिग बाॅस ओटीटीमुळे उर्फी घराघरात पोहोचली. तिच्या फॅशन्स नेहमीच चर्चेचा विषय ठरल्यात. बिग बॉसनंतर उर्फी मोठ्या प्रमाणावर प्रकाश झोतात आली. उर्फीनं बिग बॉसच्या पहिले बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Entertainment, Health, Instagram, Social media

  पुढील बातम्या