मुख्यमंत्र्यांनी केलं पंतप्रधान मोदींवरच्या बायोपिकचं पोस्टर लाँच

मुख्यमंत्र्यांनी केलं पंतप्रधान मोदींवरच्या बायोपिकचं पोस्टर लाँच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बनत असलेल्या पीएम नरेंद्र मोदी या बायोपिकचं पोस्टर लाँच वानखेडे स्टेडिअमवर नुकतंच झालं.

  • Share this:

मुंबई, 07 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बनत असलेल्या पीएम नरेंद्र मोदी या बायोपिकचं पोस्टर लाँच  वानखेडे स्टेडिअमवर  नुकतंच झालं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे लाँच झालं.

एकाच वेळी 23 प्रादेशिक भाषांमधून लाँच केलं गेलं. ओमंग कुमार हा या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून संदीप सिंग या सिनेमाची निर्मिती करणारे. मोदींच्या तरूणपणीच्या भूमिकेसाठी विवेक ओबेरॉयचं नाव निश्चित करण्यात आलं असून विशिष्ट वयानंतरची भूमिका परेश रावल करणारेत. सुरेश ओबेरॉय हे या सिनेमाचे सहनिर्माते आहेत.

ओमंगने २०१७मध्ये स्टार बॉक्सर मेरी कॉमच्या जीवनावर आधारित बायोपिकचे दिग्दर्शन केले होते. प्रियांका चोप्राने या सिनेमात मेरी कॉमची भूमिका साकारली होती. यानंतर ओमंगने संजय दत्तच्या भूमी सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. तर क्रिश ३, ओमकारा, कंपनी आणि साथिया यांसारख्या सिनेमात काम केलेल्या विवेकवर आता मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

सिनेव्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी शुक्रवारी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून यासंबंधी माहिती दिली होती. त्यांनी ट्विट करत म्हटलं की, ‘अभिनेता विवेक ओबेरॉय पंतप्रधानांची भूमिका साकारणार आहे. तर या सिनेमाचं दिग्दर्शन ओमंग कुमार आणि निर्मिती संदीप सिंग करणार आहे.जानेवारीमध्ये या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.’

First published: January 7, 2019, 4:59 PM IST

ताज्या बातम्या