'केदारनाथ' पाहिल्यावर साराबद्दल करिनानं दिली प्रतिक्रिया

'केदारनाथ' पाहिल्यावर साराबद्दल करिनानं दिली प्रतिक्रिया

सारा अली खानचा पहिला सिनेमा केदारनाथ बाॅलिवूडमध्ये अनेकांनी पाहिला. पण साराच्या छोट्या माँनं खास प्रतिक्रिया दिलीय.

  • Share this:

मुंबई, 10 डिसेंबर : 'केदारनाथ' रिलीज झाला. सिनेमाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्यात. पण सारा अली खानचं काम सगळ्यांना आवडलं. साराची छोटी माँ करिना कपूरनंही हा सिनेमा पाहिला.

वीकेण्डला करिना सैफसोबत केदारनाथ पाहायला गेली होती. तिला साराची भूमिका खूप आवडली. मिड डेशी बोलताना करिना म्हणाली, 'सारा चांगली अभिनेत्री बनणार, यात शंका नाही. ती सिनेमेही चांगले निवडते.' साराचा आता सिंबाही रिलीज होणार आहे. त्यात ती बबली गर्ल आहे.

करिना कपूर सारासाठी पार्टी ठेवणार आहे. सैफ आणि साराचे जवळचे मित्रमैत्रिणी या पार्टीत असतील. सारा आणि करिना यांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत.

काॅफी विथ करण शोमध्ये सारानं सांगितलं की तिचं या आजारामुळे वजन वाढलं होतं. तिच्या आजाराचं नाव आहे पीसीओएस. यात ओव्हरीजमध्ये गाठी येतात. यात वजनही खूप वाढतं. आणि मग ते कमी करणं हे खूप मोठं आव्हान असतं.

साराचंही वजन 96 किलो झालं होतं. तिनं ते प्रयत्नपूर्वक कमी केलं. करण जोहरचा प्रसिद्ध शो कॉफी विथ करण सिझन-6 मध्ये सैफ अली खान आणि त्याची मुलगी सारा अली खान आले आहेत. या शोमध्ये दोघांनीही फार धमाल केल्याचं दिसलं.

अभिनेत्री करिना कपूर खान ही नेहमीच आपल्याला टीव्हीवर दिसत आलीये. आता करिना एका रेडिओ शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे. 'व्हॉट वुमन वॉन्ट विथ करिना कपूर खान' या रेडिओ शोमधून करिना प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. या शोचा प्रोमा सध्या सोशल मीडियावर रिलीज झालाय. 10 डिसेंबरपासून इश्क 104.8 या रेडिओ चॅनलवर करिनाचा हा शो प्रेक्षकांना ऐकता येणारे.

अर्थात, याचबरोबर प्रेक्षकांना एक व्हिज्युअल ट्रीटही असेल. म्हणजे रेडिओ चॅनेलच्या वेबसाईटवर करिना कपूर खान सेलिब्रिटींशी गप्पा मारताना दिसेल.

या शोमध्ये करिष्मा कपूर, सनी लिओन, मनीष मल्होत्रा, स्वरा भास्कर, अमृता अरोरा असे बरेच सेलिब्रिटीज असतील. करिना सगळ्यांबरोबर गप्पा मारत धमाल करेल.

बिग बाॅसमध्ये कोण खेळतंय घाणेरडा गेम? बाहेर पडल्यावर मेघानं सांगितलं सत्य

First published: December 10, 2018, 4:39 PM IST

ताज्या बातम्या