VIDEO : किंग खाननं घेतला महानायकाचा INTERVIEW, चर्चा केली कमाईबद्दल

VIDEO : किंग खाननं घेतला महानायकाचा INTERVIEW, चर्चा केली कमाईबद्दल

शाहरुखनं अमिताभ बच्चन यांचा इंटरव्ह्यू घेतलाय. त्यांना रंजक प्रश्न विचारलेत.

  • Share this:

मुंबई, 05 मार्च : बऱ्याच दिवसांनी बाॅलिवूड शहेनशहा सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी झालेत. बदला सिनेमा रिलीजसाठी तयार आहे. येत्या शुक्रवारी ( 8 मार्च ) तो रिलीज होणार. बदलाचा निर्माता शाहरुख खानही आहे.

शाहरुखनं अमिताभ बच्चन यांचा इंटरव्ह्यू घेतलाय. त्यांना रंजक प्रश्न विचारलेत. Badla Unplugged नावानं युट्युबवर आहे.

किंग खाननं अमिताभ बच्चन यांच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल विचारलं. अमिताभ म्हणाले, की ते 50 वर्षांपूर्वी मुंबईत हिरो बनण्याचा प्रयत्न करत होते. ते बालवाडीपासून अभिनय करतायत. 15 फेब्रुवारी 1969ला अमिताभनं आपला पहिला सिनेमा साइन केला. त्याचे त्याला 5 हजार रुपये मिळाले होते.

त्यानंतर शाहरुख थट्टेनं म्हणाला, 50 वर्षांनंतरही इंडस्ट्री तेवढेच पैसे देतेय. फार बदल झालेला नाही. कितीही कठीण गेलं तरी आपण हे सर्व कलेसाठी करतो.  अर्थात दोघांच्या कमाईचा अंदाज सगळ्यांना आहे.

‘पिंक’ सिनेमानंतर अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. आगामी बदला सिनेमात दोघं एकत्र काम करत आहेत. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये अमिताभ आणि तापसी एक प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करताना दाखवण्यात आले आहेत.

शाहरुख खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून सिनेमाचं पोस्टर शेअर करत म्हटलं की, ‘आता वातावरण बदलल्यासारखं वाटत आहे.’ याआधी शाहरुखने सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांना टॅग करून ‘मी तुमचा ‘बदला’ घ्यायला येत आहे. तयार रहा.’

याला उत्तर देताना अमिताभ यांनी लिहिले की, ‘अरे शाहरुख ‘बदला’ घेण्याची वेळ निघून गेली.. आता सगळ्यांना ‘बदला’ दाखवण्याची वेळ आली आहे.’ सोशल मीडियावर बॉलिवूडच्या बादशहा आणि महानायकाचं हे संभाषण साऱ्यांनाच आवडलं होतं.

स्वराज्यरक्षक संभाजी : अशी जिंकली शंभूराजेंनी बुऱ्हाणपूर मोहीम

First Published: Mar 5, 2019 12:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading