3 बाॅयफ्रेंड्ससोबत ब्रेकअपनंतर अतिश्रीमंत सेलिब्रिटीशी 'ही' अभिनेत्री करतेय लग्न

3 बाॅयफ्रेंड्ससोबत ब्रेकअपनंतर अतिश्रीमंत सेलिब्रिटीशी 'ही' अभिनेत्री करतेय लग्न

गेलं वर्ष दीपिका, प्रियांका, सोनम कपूर यांच्या लग्नानं गाजलं. आता 2019ची सुरुवातही सेलिब्रिटीच्या साखरपुड्यानं झालीय.

  • Share this:

मुंबई, 03 जानेवारी : गेलं वर्ष दीपिका, प्रियांका, सोनम कपूर यांच्या लग्नानं गाजलं. आता 2019ची सुरुवातही सेलिब्रिटीच्या साखरपुड्यानं झालीय.

रजनीकांतचा सिनेमा '2.0'ची अभिनेत्री अॅमी जॅक्सनचा साखरपुडा झाला. तिचा होणारा नवरा ब्रिटनचा बिझनेस टायकुन जॉर्ज पानायितू आहे. 3500कोटींपेक्षा जास्त संपत्तीचा तो मालक आहे.

अभिनेत्री अॅमी जॅक्सनचे आतापर्यंत तीन बाॅयफ्रेंड्स होते. त्यातल्या एकानं तिला एका हाॅटेलबाहेर मारलंही होतं.

अॅमी 2011 ते 2012पर्यंत स्मिता पाटीलचा मुलगा प्रतिक बब्बरला डेट करत होती. त्यानंतर ती बाॅक्सर सेलकिर्कसोबत डेट करत होती. त्यानंच अॅमीला भर रस्त्यावर चोप दिला होता. त्याच्यावर कारवाईही झाली होती.

प्रतिक बब्बरसोबत अॅमी

प्रतिक बब्बरसोबत अॅमी

अॅमीचं तिसरं अफेअर अभिनेता रायन थॉमससोबत होतं. ते 7 महिने चाललं. आता जॉर्ज पानायितूसोबत ती लग्नही करणार आहे. आता अॅमीचं आयुष्य सुखात जाओ, असं तिच्या जवळच्या मित्रांना वाटतंय.

सेलकिर्कसोबत अॅमी

सेलकिर्कसोबत अॅमी

जॉर्ज पानायितूचा इतिहासही फार बरा नाही. त्यानं आपल्या भावांबरोबर पोलिसांवर हल्ला केला होता. त्याला 6 महिन्याची शिक्षा झाली होती. जाॅर्ज हा ब्रिटनमधल्या श्रीमंत व्यक्तींमध्ये गणला जातो. त्याची लंडनला बरीच हाॅटेल्स आहेत. ब्रिटिश प्रॉपर्टी डेव्हलपर एंड्रस पानायिटूचा मुलगा आहे.

अॅमी जॅक्सननं 2.0मध्ये भूमिका साकारली होती. ती सिनेमात रोबोच झाली होती.

गेलं वर्ष सेलिब्रिटींच्या लग्नानं गाजलं. प्रियांका-निक, दीपवीर, सोनम कपूर, नेहा धुपिया, कपिल शर्मा यांची लग्न बरीच गाजली होती. या लग्नात सगळ्यांना अनोखा नजारा पाहायला मिळाला होता.

कपिल शर्माचं झालं लाखोंचं नुकसान, एका एपिसोडला मिळतायत 'इतकेच' पैसे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 3, 2019 04:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading