आगरी समाज 'चला हवा येऊ द्या'वर संतापला, माफी मागण्याची मागणी

आगरी समाज 'चला हवा येऊ द्या'वर संतापला, माफी मागण्याची मागणी

कुशल बद्रिके आणि डाॅ. निलेश साबळे यांच्या नावे त्यांनी पत्र पाठवलंय.

  • Share this:

मुंबई, 11 नोव्हेंबर : 'चला हवा येऊ द्या' हा झी मराठीवरचा लोकप्रिय कार्यक्रम. पण या कार्यक्रमात वेगवेगळ्या प्रकारचे विनोद नेहमीच लोकांना हसवत असतात. भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे यांची स्टाइल, देहबोली फलातून असते. पण या कार्यक्रमावर आक्षेप घेतलाय आगरी समाजानं. त्यांच्या मते कार्यक्रमात आगरी भाषेचं जे विडंबन केलं जातं, ते आक्षेपार्ह आहे.


कुशल बद्रिके आणि डाॅ. निलेश साबळे यांच्या नावे त्यांनी पत्र पाठवलंय.


आगरी समाज नेते जयेंद्र खुणे यांनी पत्र पाठवलंय. पत्रात म्हटलंय, 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून आपण आणि आपली संपूर्ण टीम नेहमीच आगरी समाजाची विटंबना आणि बदनामी करत आले आहात.आगरी कोळी समाजात आपल्या टीव्ही सीरियलमुळे खूप संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या टीमला आम्ही सन्मानाने आगरी कोळी महोत्सवला निमंत्रित करीत असतो पण यापुढे करणार नाही .आपल्या कलेचा नेहमी आगरी कोळी समाजाने सन्मान केला आहे.परंतु आगरी कोळी समाजाची बदनामी सहन केली जाणार नाही. तेव्हा आपण व आपल्या टीमने त्वरित आगरी कोळी समाजाची जाहिर माफी मागावी .अन्यथा माझ्या आगरी कोळी समाजाची विटंबना व बदनामी सहन करणार नाही.यापुढे होणाऱ्या सर्व प्रकाराला आपण व आपली टीम जबाबदार असेल याची नोंद घ्यावी.

Loading...


कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे म्हणत निलेश साबळे सगळ्यांच्याच घराघरात पोचलाय, तर आपल्या नेहमीच्या प्रेमळ वागण्यातून आदेश बांदेकर सगळ्यांनाच आपलेसे वाटतात.


मध्यंतरी चला हवा येऊ द्या या शोने प्रेक्षकांची रजा घेतली होती. त्यानंतर या मालिकेनं परदेश दौरेही केले होते.


इथे ऑफिसमध्ये झोपल्यावरही कापला जात नाही पगार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 11, 2018 11:49 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...