लोकप्रिय वाहिनीवर रंगणार आदेश बांदेकर आणि संजय मोनेची अदाकारी!

लोकप्रिय वाहिनीवर रंगणार आदेश बांदेकर आणि संजय मोनेची अदाकारी!

झी मराठीवर दोन नवे शोज सुरू होतायत.

  • Share this:

विराज मुळे, प्रतिनिधी

मुंबई, 9 नोव्हेंबर : दर आठवड्याला टीआरपी रेटिंग कार्ड येत असतं. त्यात फक्त आणि फक्त झी मराठीच्याच पाच मालिका असतात. कुठलीच वाहिनी अजून पहिल्या पाचात आली नाहीय. आता यात आणखी भर पडतेय नव्या शोजची.

झी मराठीवर दोन नवे शोज सुरू होतायत. त्यात एक आहे मुलाखतींचा. काही वर्षांपूर्वी याच वाहिनीवर खुपते तिथे गुप्ते हा अवधूत गुप्तेचा शो होता. आता नवा मुलाखतींचा शो सुरू होतोय तो होस्ट करणार आहे अभिनेता संजय मोने. आता संजय मोने म्हटल्यावर काही तरी विक्षिप्तपणा त्या शोमध्ये असेल. यात वेगवेगळ्या दिग्गजांच्या मुलाखती पाहायला मिळतील.

हल्ली मुलाखतींचे कार्यक्रम बघितले जातात. कलर्स मराठीवर इरसाल नमुने हा मकरंद अनासपुरेचा शो आहेच. शिवाय काॅफी विथ करण हा शोही लोकप्रिय आहे. झीच्या या नव्या शोमध्ये काय पाहायला मिळतंय हे कळेलंच.

दुसरा शो सुरू होतोय तो आहे सांगीतिक. म्हणजे अंताक्षरी, ताकधिनाधिन टाईप असेल. आणि त्या शोचं सूत्रसंचालन करणार आदेश बांदेकर. आदेशच्या करियरची सुरुवात ताकधिनाधिननंच झाली होती. होम मिनिस्टरमुळे घराघरात पोचलेले बांदेकर आता सांगितिक शोमधून भेटायला येणार आहेत.

काही दिवसांपूर्वी झी मराठी अवाॅर्ड सोहळा मोठ्या दणक्यात झाला. यात अनेकविध कार्यक्रम झाले. मालिकांमधल्या व्यक्तिरेखांचा गौरव झाला. पण या सोहळ्यात सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम ठरला तो आदेश बांदेकर आणि सगळ्या नायक-नायिकांचं नृत्य.

सत्ते पे सत्ता सिनेमातल्या गाजलेल्या गाण्यांवर सुबोध भावे, अभिजीत खांडकेकर, अतुल परचुरे यांनी एकच धमाल केली. त्यांना साथ द्यायला ईशा, राधिका, पाठकबाई होत्याच. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमिताभ बनून आलेले आदेश भाऊजी. या सगळ्यांनी मिळून कार्यक्रमाला चार चांद लावले.

Birthday Special : मी मस्तीभरं आयुष्य जगत नाही - सुबोध भावे

First published: November 9, 2018, 12:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading