उमेश-प्रियाच्या आयुष्यात आला तो आनंदाचा क्षण!

उमेश-प्रियाच्या आयुष्यात आला तो आनंदाचा क्षण!

आपले मराठी सेलिब्रिटीही आपल्या आयुष्यातल्या छोट्या मोठ्या गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या फॅन्सनाही त्यांचे अपडेट्स वाचायला आवडतात.

  • Share this:

मुंबई, 28 नोव्हेंबर : आपले मराठी सेलिब्रिटीही आपल्या आयुष्यातल्या छोट्या मोठ्या गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या फॅन्सनाही त्यांचे अपडेट्स वाचायला आवडतात. अशाच एका सेलिब्रिटींची एक गुड न्यूज फेसबुकवर शेअर झालीय.

अभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापट आई-बाबा बनणार आहेत. प्रियानं आपल्या फेसबुक पेजवर ही गोड बातमी शेअर केलीय. उमेश आणि प्रियाचं लग्न आॅक्टोबर 2011मध्ये झालं.

दोघंही खूप चांगले कलाकार आहेत. या वर्षी प्रिया बापटचे गच्ची, आम्ही दोघी हे सिनेमे रिलीज झाले. 'टाइमपास 2'मधल्या तिच्या भूमिकेचं खूप कौतुकही झालं.

उमेश आणि प्रिया आरोग्याची खूप काळजी घेतात. दोघंही न चुकता जिमला जातात. उमेशनं सांगितलं होतं, 'सध्या आपण सगळेच बऱ्याच तणावांना सामोरं जात असतो. रॅट रेसमध्येही असतोच. अशा वेळी माझे फिटनेस गुरू शैलेश परुळेकर सांगतात, शारीरिक आणि मानसिक फिटनेस दोन्ही महत्त्वाचा असतो. कलाकारांसाठी फ्लेक्झिबिलिटी महत्त्वाची असते. तणाव कमी करण्यासाठी जसे मेडिटेशन हवं, तसा शारीरिक व्यायामही हवा.'

तो म्हणाला, 'मी अनेकदा भूमिकेच्या गरजेप्रमाणे व्यायाम करतो. आऊटडोअरला असतो तेव्हा सायकलिंग, चालणं, जाॅगिंग करतो.मला मैदानी खेळ आवडतात. तसंच मी टेबल टेनिसही करतो. खेळामुळेही शरीर तंदुरुस्त राहतं.'

उमेश चेंबुरहून कांदिवलीला जिमसाठी जातो. शैलेश परुळेकरांची जिम तिथे आहे. तो म्हणतो , त्यांनीच मला सांगितलंय, तुम्हाला जेव्हा लो वाटतं, तेव्हा तुम्हा काॅर्डिओ करा आणि आत्मविश्वास कमी वाटला, तर वेट लिफ्टिंग करा. वाॅर्म अप, वेट लिफ्टिंगही महत्त्वाचं.

प्रिया-उमेश या नव्या गुड न्यूजमुळे खूश आहेत. आमच्या त्यांना शुभेच्छा!

First published: November 29, 2018, 12:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading