कपिलला एका एपिसोडला मिळतात 'एवढे' पैसे, कृष्णानं सांगितलं गुपित

कपिलला एका एपिसोडला मिळतात 'एवढे' पैसे, कृष्णानं सांगितलं गुपित

कृष्णानं सांगितलं, या शोचा निर्माता आहे सलमान खान. तो त्याच्या उदारपणासाठी प्रसिद्ध आहे.

  • Share this:

मुंबई, 07 जानेवारी : काॅमेडी किंग कपिल छोट्या पडद्यावर परतलाय. 29 डिसेंबरपासून द कपिल शर्मा शो सुरू झालाय. प्रेक्षकांना कपिलचं काॅमेडीचं टायमिंग आवडतं. पण यावेळी कपिलला पैशाबाबत जबरदस्त धक्का मिळालाय. अशा बातम्या येत होत्या. पण काॅमेडीयन कृष्णानं याचं उत्तर दिलंय.

कृष्णानं बाॅलिवूड लाईफशी बोलताना सांगितलंय, ही एक अफवा आहे. अशी काही परिस्थिती नाहीय. आम्ही आमची फी नक्की करू शकतो. पूर्वी कपिलला एका एपिसोडला 60 ते 70 लाख मिळायचे. आताही तसंच आहे. आजघडीला द कपिल शर्मा शो हा देशातला सर्वोत्तम काॅमेडी शो आहे.

कृष्णानं सांगितलं, या शोचा निर्माता आहे सलमान खान. तो त्याच्या उदारपणासाठी प्रसिद्ध आहे. तो कलाकारांची फी कमी करत नाही. या शोशी संबंंधित अजून एकानं सांगितलं की काही दिवसातच या शोची लोकप्रियता पुन्हा एकदा कळेल.

2016मध्ये कपिल जेव्हा सुनील ग्रोवर, कीकू शारदा, चंदन प्रभाकर यांच्यासोबत शो करत होता, तेव्हा त्याला प्रत्येक एपिसोडला 60 ते 70 लाख मिळत होते.

कपिलची एका एपिसोडची फी कमी झालीय. ती 15 लाखावर आलीय. अगदी भारती आणि कृष्णालाही प्रत्येक एपिसोडला 10 ते 12 लाख रुपये मिळता, ही एक अफवा होती.

कपिलच्या शोमध्ये सलमान, सोहेल आणि अरबाज हे तिघं भाऊ एकत्र आले होते. यावेळी कपिलनं तुमची शाळेत मारामारी व्हायची का, असा प्रश्न विचारला. तेव्हा सोहेलनं एक किस्सा सांगितला. एकदा बँड स्टँडला त्यांच्या घराखाली एका फॅननं लक्ष वेधून घेण्यासाठी शिव्या द्यायला सुरुवात केली. सोहेलला वाटलं, तो एकटाच असेल म्हणून त्यानं विचारलं शिव्या का देतोयस? त्यावर अनेक जण येऊन सोहेलला मारायला लागले.

त्यानंतर सलमान म्हणाला, ' मी सोहेलच्या मदतीला आलो. तसा माझ्या पाठीतही बांबूचा मार पडला. एरवी सिनेमात तो बांबू तुटतो. पण त्यावेळी चांगलंच लागलं.' सलमाननं हे अॅक्शन करून दाखवलं.

PHOTOS : रणवीर-दीपिका हनिमूनहून आले परत, विमानतळावर कॅमेऱ्यात कैद

First published: January 7, 2019, 6:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading