'तुला पाहते रे'चं शूटिंग संपलं आणि 'असा' झाला शेवट

'तुला पाहते रे'चं शूटिंग संपलं आणि 'असा' झाला शेवट

Tula Pahate Re, Subodh Bhave, Abhidnya Bhave - तुला पाहते रे मालिकेचं शूटिंग संपलं. आता पुढच्या महिन्यात मालिका निरोप घेतेय.

  • Share this:

मुंबई, 29 जून : 'तुला पाहते रे' मालिका जुलैमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेचं शूटिंग आता संपलंय. अभिनेत्री अभिज्ञा भावेनं तशी पोस्ट फेसबुकवर शेअर केलीय आणि सोबत फोटोही टाकलेत. अभिज्ञा भावेनं सुरुवातीला मालिकेत ग्रे शेड दाखवली होती. पण नंतर तिच्या व्यक्तिरेखेनं ईशाला मदत केली.

शूटिंगच्या वेळची सगळी धमाल तिनं फेसबुकवर पोस्ट केलीय. अभिज्ञाची मायरा अनेकांना आवडली होती. अभिज्ञा म्हणाली होती, 'मायरा कामात परफेक्ट आहे. ती सेल्फमेड आहे. मेहनती आहे. विक्रांतवर तिचं प्रेम असलं तरी कामात ती चोख आहे. तिच्यामुळे कंपनीला नुकसान झालं तर ती त्याची भरपाईही करतेय. ती आयतं खात नाही. ती एथिकल आहे. तिनं विक्रांतच्या प्रगतीत स्वत:ची प्रगती पाहिलीय. त्यामुळे आताची तिची रिअॅक्शनही स्वाभाविक आहे.' अभिज्ञा या मायराला फार जवळून ओळखते, असंच वाटत होतं.

मालिकेचा शेवट काय असा प्रश्न अनेकांना पडलाय. विक्रांत सरंजामेला केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप झालाय. तो ईशावर खरंच प्रेम करायला लागलाय. पण तरीही ईशा त्याला धडा शिकवतेच. विक्रांत स्वत:च स्वत:ला शिक्षा करून घेतो.

ईशानं विक्रांतची सगळी माणसं तोडली.त्याला एकटं पाडलंय.

'ही' मराठमोळी अभिनेत्री मुलासाठी अमेरिकेत शोधतेय कॉलेज

या आहेत सर्वात श्रीमंत 7 अभिनेत्री, मालमत्ता ऐकून पायाखालची जमीन सरकेल

ईशाची भूमिका करणाऱ्या गायत्रीनं इंजिनियरिंग केलंय. अभिनयाची आवड होतीच काॅलेजच्या नाटकांमध्ये काम केलं होतंच. पण इथे आॅडिशन्स देऊनच ती मालिकेत आली. गायत्री अवधूत गुप्तेसोबतही एका सिनेमात काम करणार आहे. पण 'तुला पाहते रे' ही तिची पहिलीच मालिका.

'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये धक्कादायक ट्विस्ट, गुरूला मिळणार 'अशी' शिक्षा

सुबोध भावेबरोबर काम करण्याची गायत्रीची इच्छा पूर्ण झाली. ती म्हणाली होती, ' मी सुबोध भावेसोबत काम करतेय, ही माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. एवढ्या मोठ्या कलाकाराबरोबर काम करायला मिळणं ही तुमच्या करियरसाठी सकारात्मक गोष्ट आहे.'

VIDEO: सुप्रिया सुळे वारीत सहभागी, हाती वीणा आणि मुखी ज्ञानबा तुकारामचा नारा...

First Published: Jun 29, 2019 08:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading