VIDEO : एक वर्ष कपिल शर्मा काय करत होता, सांगतोय किकू शारदा

VIDEO : एक वर्ष कपिल शर्मा काय करत होता, सांगतोय किकू शारदा

काॅमेडी किंग कपिल शर्माची सगळे जण वाट पहातायत. पुन्हा एकदा द कपिल शर्मा शोचा नवा सीझन येतोय. शोचं शूटिंग सुरू झालंय.

  • Share this:

मुंबई, 19 डिसेंबर : काॅमेडी किंग कपिल शर्माची सगळे जण वाट पहातायत. पुन्हा एकदा द कपिल शर्मा शोचा नवा सीझन येतोय. शोचं शूटिंग सुरू झालंय.

फॅन्ससाठी खूशखबर आहे. पहिल्या एपिसोडमध्ये दस्तुरखुद्द सलमान खान आहे.कारण या शोचा सलमान निर्माताही आहे. पहिला प्रोमो रिलीज झालाय. त्यात सलमान खान, सलीम खान, सोहेल खान, अरबाज खान, आहेत. सलमान खानचं कुटुंबच या शोमध्ये दिसेल.

याशिवाय सिंबाची टीम कपिल शर्माच्या शोमध्ये असणार आहे. रणवीर सिंह, सारा अली खान आणि रोहित शेट्टी यांचा दिलखुलास अंदाज आपल्याला शोमध्ये पाहायला मिळणार आहे.

शोचा दुसरा प्रोमोही रिलीज झालाय. त्यात कपिल वर्षभर काय करत होता हे किकू शारदा सांगणार आहे. किकूची धमाल अदा बऱ्याच दिवसांनी पाहायला मिळालीय.

कपिल शर्माचं नुकतंच गिन्नीशी लग्न झालंय. कपिल म्हणाला, गिन्नी खूप अध्यात्मिक आहे. ती पूजाअर्चा करते. कपिलसाठी नेहमी देवाजवळ प्रार्थना करते. कपिल-गिन्नी जालंधरच्या काॅलेजमध्ये शिकत होते. पाॅकेटमनीसाठी कपिलनं नाटकाचं दिग्दर्शन सुरू केलं. तिथे गिन्नी आणि त्याची मुलाखत झाली. 2005पासून त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली.

'संभाजी' मालिकेतले खलनायक अनाजी पंतांवरच्या मिम्स होतायत व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 19, 2018 04:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading