दिवाळीमध्ये संजय दत्तचं 'खलनायक' रूप, मीडियाला केली शिवीगाळ, Video व्हायरल

दिवाळीमध्ये संजय दत्तचं 'खलनायक' रूप, मीडियाला केली शिवीगाळ, Video व्हायरल

संजयच्या घराबाहेरील मीडिया कर्मचाऱ्यांना संजय दत्तने शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 11 नोव्हेंबर : यंदा बॉलिवूडमध्ये जोरदार दिवाळी साजरी केली गेली. अनेक कलाकारांनी दिवाळीनिमित्त पार्टीसुद्धा दिली. बॉलिवूडचा बाबा संजय दत्तच्या घरीसुद्धा दिवाळी साजरा करण्यात आली.

संजय दत्तच्या मुलाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात संजय दत्तचा मुलगा सगळ्या मीडिया कर्मचाऱ्यांना पाणी प्यायलात का असा प्रश्न विचारताना दिसून आला. यावेळी संजय दत्तने मुलाला हा प्रश्न विचारायला सांगितला होता.

यानंतर अभिनेता संजय दत्त एका व्हिडिओमध्ये शिवी देताना दिसून आला आहे. मीडियातील कॅमेरामन संजय दत्तचा फोटो काढत होते. यावेळी तो दारूच्या नशेत असल्याचं दिसून येत होता. संजय दत्तने तिथे असलेल्या मीडिया कर्मचाऱ्यांना घरी जाण्यासाठी सांगितलं. तुमच्या घरी दिवाळी नाही का? असा सवाल संजयने केल्यावर बॉसने काम करायला सांगितलं आहे असं उत्तर संजयला मिळालं.

यावर संजय दत्तने रागाच्या भरात मीडियाला आणि बॉसला शिवीगाळ केली. एकीकडे अभिनेता संजय दत्त मुलासमोर संस्कार दर्शवत आहे तर दुसरीकडे स्वत: शिवीगाळ करत आहे.  संजय दत्तचा शिव्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओत शिव्या असल्यानं आम्ही तो देत नाहीय.

Birthday Special : 'असं' करणार शनाया वाढदिवसाचं सेलिब्रेशन!

First Published: Nov 11, 2018 10:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading