नववर्षाच्या स्वागताला मलायकाचा अनोखा फंडा

नववर्षाच्या स्वागताला मलायकाचा अनोखा फंडा

नव्या वर्षाचं स्वागत रात्री 12वाजता जल्लोषात केलं जातं. त्यामुळे अनेकांची 1 जानेवारीची सकाळ ही झोपेतच उजाडते. पण मलायकानं एक शक्कल लढवलीय. तिनं वर्कआऊटचा फोटो आधीच शेअर केलाय.त्यामुळे नवीन वर्षातला तिचा संकल्प समोर आलाय.

  • Share this:

मुंबई, 01 जानेवारी : नव्या वर्षाचं स्वागत रात्री 12वाजता जल्लोषात केलं जातं. त्यामुळे अनेकांची 1 जानेवारीची सकाळ ही झोपेतच उजाडते. पण मलायकानं एक शक्कल लढवलीय. तिनं वर्कआऊटचा फोटो आधीच शेअर केलाय.त्यामुळे नवीन वर्षातला तिचा संकल्प समोर आलाय.

मलायकानं इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केलाय. तो आहे जिममधल्या वर्कआऊटचा. त्या फोटोत तिची ट्रेनर नम्रता पुरोहितही दिसतेय. तिनं फोटोखाली 2018चा निरोप घेतलाय आणि 2019चं स्वागत केलंय.


वर्षाच्या पहिल्या दिवशी वर्कआऊट करण्याचा सेलिब्रिटीचा फोटो कुणालाही उत्साह देऊन जाईल. पुन्हा या फोटोद्वारे मलायका फिटनेसच्या फंड्याबद्दलही सांगून जाते.

कॉफी विथ करण शोमध्ये करण जोहरनं अर्जुनच्या गर्लफ्रेंडबाबत आलिया भट्टला प्रश्न विचारला. त्यावेळी आलिया गडबडली आणि गप्प राहणं पसंत केलं होतं. सध्या बऱ्याच चर्चेत असलेल्या जोडप्याची रोज एक नवी बातमी येत आहे.

आता तर एक नवीन माहिती समोर येत आहे. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा एकमेकांच्या इतके प्रेमात असतील हे माहीत नव्हतं. अर्जुन-मलायकानं एकत्र राहण्यासाठी आता नवा पर्याय शोधला आहे.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा दोघांनी मिळून नवीन घर घेतल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईतील लोखंडवालाच्या जवळ एका सोसायटीमध्ये हा फ्लॅट घेतला आहे.

मलायका अर्जुनने घेतलेल्या नव्या घरासाठी दोघांनी गुंतवणूक केली आहे. सध्या या फ्लॅटचं इंटिरिअरचं काम सुरू आहे. दोघेही फ्लॅटची देखरेख करत आहेत. घराचं काम पूर्ण झालं की दोघे सोबत राहणार की नाही याबाबत अजून माहिती मिळालेली नाही.


Birthday Special : जेव्हा सोनालीच्या मुलाला आईच्या कॅन्सरबद्दल कळलं होतं...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 1, 2019 12:33 PM IST

ताज्या बातम्या