धर्मेंद्र फावल्या वेळात काय करतात? ईशानं सांगितलं गुपित

धर्मेंद्र फावल्या वेळात काय करतात? ईशानं सांगितलं गुपित

ईशा देओलला पप्पा धर्मेंद्र यांनी शेतातून खास गिफ्ट पाठवली.

  • Share this:

मुंबई, 08 फेब्रुवारी : ईशा देओल सध्या खूप खूश आहे. तिच्या लाडक्या पप्पांनी तिला खास गिफ्ट पाठवलीय. ही गिफ्ट काय आहे, हे माहितीय? तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

धर्मेंद्रनं ईशाला ताज्या भाज्या भेट म्हणून पाठवल्यात. खूप कमी जणांना ठाऊक आहे की धर्मंद्रला शेती करायला आवडतं. त्याला वेळ मिळतो तेव्हा तो फार्म हाऊसला जातो.

तिथूनच त्यानं ईशासाठी वांगी, कांदे आणि कणसं पाठवली. ईशानं त्याचा फोटो इन्स्टावर टाकलाय. त्याला खूप छान कॅप्शनही दिलीय. तिनं लिहिलंय, पप्पांनी थेट शेतातून ताज्या भाज्या पाठवल्यात. खायला चाललीय. या ताज्या भाज्या आशीर्वादापेक्षा कमी नाहीत. सध्या भाज्या इतक्या महाग झाल्यात. पप्पांनी त्या शेतातून पाठवणं ही खूप चांगली गोष्ट आहे.

View this post on Instagram

“GO ORGANIC GROW ORGANIC “

A post shared by Dharmendra Deol (@aapkadharam) on

धर्मेंद्र 83 वर्षांचे आहेत. बरासचा वेळ ते शेतात घालवतात. ईशा सध्या दुसऱ्यांदा गरोदर आहे. त्यामुळे हेमामालिनी आणि धर्मेंद्र तिची काळजी घेतायत. धर्मेंद्र अनेकदा आपल्या इन्स्टावर शेतातले व्हिडिओ अपलोड करतात. धर्मेंद्र स्वत: शेतकरी कुटुंबातले आहेत.

First published: February 8, 2019, 5:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading