मुंबई, 16 फेब्रुवारी : व्हॅलेंटाइन्स डेला 'प्रेम'ळ फोटो शेअर केल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आलीय. अशी बातमी की ज्यानं सगळ्यांना धक्का बसू शकतो.
असं म्हणतायत लग्नानंतर 2 महिन्यांनी प्रियांका गरोदर आहे. निक जोनसच्या घरी खूशखबर येणार आहे.सोशल मीडियावर प्रियांकाचा एक फोटो व्हायरल होतोय. त्यात तिचं पुढे आलेलं पोट दिसतंय.
प्रियांकानं टाइट फिटिंगचा ड्रेस घातलाय. त्यात तिचं पोट दिसतंय. त्यामुळेच ती गरोदर असल्याची बातमी पुढे आलीय. काहींनी त्यावर मोहोरही लावलीय.
ही बातमी खरी आहे की अफवा हे अजून समोर आलेलं नाहीय. काही जण असं काही नाहीय म्हणतायत. तर काहींचं म्हणणं असं आहे की प्रियांका आणि निक अजून गरोदर असल्याची बातमी उघड करू इच्छित नाहीत.
अर्थात, मागे एका इंटरव्ह्यूमध्ये निक म्हणाला होता मी लवकरच फॅमिली हवी आहे. प्रियांकानंही त्याला दुजोरा दिला होता. त्यामुळे प्रियांका गरोदर आहे, ही बातमी खरी असू शकते. योग्य वेळी ती सगळ्यांसमोर येईलही.
प्रियांका चोप्रा सध्या अमेरिकेत पती निक जोनससोबत राहते. यावेळी ती अनेक अमेरिकी टीव्ही शोमध्ये गेली होती. प्रियांकाने पाचव्यांदा या परदेशी चॅट शोमध्ये सहभाग घेतला आहे. यावेळी प्रियांकाने आपल्या लग्नाचे अनेक किस्से सांगितले. प्रियांकाने लग्नाच्या प्लॅनिंगवरून ते लग्नाचं ठिकाण निश्चित करण्यापर्यंतचे अनेक किस्से सांगितले.
प्रियांका नुकतीच जिम्मी फॅलेन या प्रसिद्ध चॅट शोमध्ये गेली होती. यावेळी जिमीने प्रियांकाला तिच्या लग्नाबद्दलचेच जास्त प्रश्न विचारले.
प्रियांका म्हणाली की, मला एका खासगी आयलँडवर लग्न करण्याची इच्छा होती. सेशेल्स, मालदीव किंवा मोरिशसमध्ये लग्न करण्याची इच्छा होती. पण निकच म्हणाला की भारतात लग्न करू. कारण की निकला त्याच्या नवरीला अर्थात मला भारतातूनच सासरी न्यायचं होतं. राजस्थानमध्ये लग्न करण्याची कल्पना त्याची होती.
#FitnessFunda : असं केलं आर्चीनं वजन कमी, जाणून घ्या तिचं सिक्रेट