शाहरुख,सलमान,रणवीर, हृतिक आणि कंगना लवकरच दाखवणार जलवा!

डिसेंबरपासून पुढच्या वर्षी बाॅलिवूडचे एकापेक्षा एक सरस सिनेमे रिलीज होतायत. या सिनेमात बाॅलिवूडचे सगळे मोठे स्टार्स आपला करिष्मा दाखवायला सज्ज झालेत.

  • Share this:

डिसेंबरपासूनच धमाकेदार सिनेमांची सुरुवात होतेय. शाहरुखनं झीरोमध्ये बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारलीय.शाहरुखने या चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज केलं ते अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत. चित्रपटात अनुष्काने शास्त्रज्ञाची भूमिका बजावली आहे. ‘नातं बरोबरीचं’ असं कॅप्शन देत सोशल मीडियावर पोस्टर शेअर करण्यात आलं. पोस्टर आणि त्याचं कॅप्शन पाहता चित्रपटात शाहरूख आणि अनुष्काची मैत्री किंवा मैत्रीपलीकडील प्रेम पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

याच वर्षी रणवीर सिंगचा जलवा सिंबामध्ये पाहायला मिळेल. सिंबा हा सिनेमा टेंपर या दाक्षिणात्य सिनेमावर बेतलाय. करण जोहर निर्मित सिंबा चित्रपटात सारा अली खान दिसणार आहे. सिंबामध्ये मराठी कलाकारांची फौजच आहे. सिद्धार्थसोबत सौरभ गोखले, विजय पाटकर, नंदू माधव यांच्याही भूमिका आहेत.

जानेवारी 2019मध्येही चित्रपटांची मेजवानी आहे. बहुचर्चित मणिकर्णिका आहे. त्यात कंगनानं झाशीच्या राणीची भूमिका साकारलीय. ऐतिहासिक सिनेमा इतिहासप्रेमींना ट्रिट आहे.

मणिकर्णिकाला टक्कर द्यायला येणार हृतिक रोशन. हृतिकने शिक्षक दिनाची संधी साधत त्याचा आगामी चित्रपट ‘सुपर ३०’चं फर्स्ट लुक प्रसिद्ध केलं. हृतिकसोबत या पोस्टरमध्ये ३० मुलं दिसत आहेत. त्याचबरोबर या फोटोमध्ये ‘ अब राजा का बेटा राजा नही बनेगा... अब राजा वही बनेगा जो हकदार होगा’ हे वाक्य दिसत आहे. आता या वाक्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की या चित्रपटात नेमकं काय असणार आहे. विकास बहल दिग्दर्शित हा चित्रपट पुढच्या वर्षी २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  हा चित्रपट पाटण्यामध्ये  गरीब मुलांची फुकट  आयआयटीच्या प्रवेशपरीक्षेची तयारी करून घेणाऱ्या आनंद कुमारच्या आयुष्यावर बेतलेला आहे. आनंद कुमारचे 465 विद्यार्थी 15 वर्षात आयआयटीमध्ये निवडले गेले.

कंगना आणि हृतिकशी सामना करायला येतोय इम्रान हाश्मी. त्याच दिवशी चिट इंडियाही रिलीज होईल. काॅलेजेसमध्ये होणाऱ्या एन्टरन्स एक्झामवेळी होणारा गैरव्यवहार सिनेमात दाखवलाय.

अक्षय कुमारचा केसरी होळीच्या दिवशी रिलीज होणार आहे. सारागढीची लढाई, शहीद झालेले जवान यावर हा सिनेमा बेतलाय.

बहुचर्चित भारत सिनेमा ईदला रिलीज होईल. बाॅलिवूडचा दबंग खान सध्या भारत सिनेमाच्या शूटिंगमध्ये खूपच बिझी आहे. या सिनेमात सलमान खान आणि कतरिना कैफ तुम्हाला सरप्राईझ देणार आहेत. शिवाय या सिनेमात जास्त अॅक्शन्स आहेत. नुकताच एक भयंकर स्टंट शूट झालाय. सिनेमाचा दिग्दर्शक अब्बास अली जफरनं सोशल मीडियावर ट्विट केलंय. त्यानं म्हटलंय, नुकताच मौत का कुवाचा भयंकर स्टंट केला. उत्तर प्रदेशातल्या रायडर्सनं हा स्टंट केला. माझ्या आयुष्यातला सर्वात खतरनाक स्टंट आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 22, 2018 12:24 PM IST

ताज्या बातम्या