...म्हणून मुंबई मेट्रोवर चढून बसला अक्षय कुमार

...म्हणून मुंबई मेट्रोवर चढून बसला अक्षय कुमार

बाॅलिवूड खिलाडी अक्षय कुमार स्टंट करायच्या सर्व मर्यादा पार करत असतो. आता हा फोटोच पाहा. यात अक्की चक्क बसला आहे मेट्रोवर.

  • Share this:

मुंबई, 05 मार्च : बाॅलिवूड खिलाडी अक्षय कुमार स्टंट करायच्या सर्व मर्यादा पार करत असतो. आता हा फोटोच पाहा. यात अक्की चक्क बसला आहे मेट्रोवर. मेट्रो ट्रेनवर अक्षयला उभं राहायची वेळ का बरं आली असावी?

हा फोटो क्लिक केलाय फोटोग्राफर डब्बू रतनानीनं. अक्षयनं ही सगळी मेहनत डब्बूच्या कॅलेंडर शूटसाठी केलीय. अक्षयच्या या फोटोवर फॅन्सच्या कमेंट्सचा जणू महापूर आलाय.

 

View this post on Instagram

 

🚇 #DabbooRatnaniCalendar 📷 : @dabbooratnani @manishadratnani

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on

फिरोज खान नावाच्या युजरनं लिहिलंय, असं वाटतंय पाय दुसऱ्या कुणाचे आहेत. या युजरचं निरीक्षण खूप दिसतंय. अक्षयच्या पोजमुळे असं वाटू शकतं. एडिटिंग आणि फोटोशाॅपच्या जमान्यात सर्व काही शक्य होतं. पण अक्कीच्या फॅन्सना त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. सतीश श्रीमल नावाच्या युजरनं लिहिलंय, भाई का हर शाॅट निराला है.

यावर्षी अक्षयचा बहुचर्चित केसरी सिनेमा रिलीज  होतोय. 2020मध्ये अक्षय कुमार रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी सिनेमात दिसेल. यात तो पोलीस इन्स्पेक्टर आहे.

अक्षय कुमार सामाजिक कामातही पुढे असतो. अक्षय कुमारनं पुलवामा इथे शहीद झालेला जवान जीतराम गुर्जरच्या कुटुंबाला 15 लाख रुपयांची मदत केलीय. सीआरपीएफच्या डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल जगदीश नारायण मीना यांनी ही माहिती दिलीय. अक्षय कुमारनं हे डोनेशन भारताच्या वीर ट्रस्टतर्फे दिलंय. अक्षयनं याआधीही वीर ट्रस्टला 5 कोटी रुपये दिले होते. अक्षयनं ट्विटरवरून लोकांना शहिदांच्या कुटुंबाला मदत करायचं अपिल केलं होतं.

अक्षयच्या फॅन्सनी तर त्याचं कौतुक केलंच, पण शहीद कुटुंबानंही अक्षयचे आभार मानलेत. शहीद जीतरामचे छोटे भाऊ विक्रम सिंह यांनी सांगितलं की ते या कुटुंबात कमावणारे एकटेच होते. या मदतीची त्यांच्या कुटुंबाला गरज होतीच.

स्वराज्यरक्षक संभाजी : अशी जिंकली शंभूराजेंनी बुऱ्हाणपूर मोहीम

First Published: Mar 5, 2019 02:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading