Big Boss 12 : शेवटी अनुप जलोटा-जसलीनच्या नात्यातलं सत्य बाहेर आलंच

बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अनुप जलोटानं दिलेल्या मुलाखतीत एक सत्य बाहेर आलंय.

News18 Lokmat | Updated On: Oct 29, 2018 05:05 PM IST

Big Boss 12 : शेवटी अनुप जलोटा-जसलीनच्या नात्यातलं सत्य बाहेर आलंच

मुंबई, 29 आॅक्टोबर : यावेळी बिग बाॅसचा वीकेण्ड वार चांगलाच रंगलाय.  सबा, सृष्टी, सुरभि आणि अनुप जलोटा नाॅमिनेट झाले होते. त्यातून सबा आणि अनुप जलोटांनी बिग बाॅसच्या घराचा निरोप घेतलाय. बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अनुप जलोटानं दिलेल्या मुलाखतीत एक सत्य बाहेर आलंय.

अनुप जलोटा म्हणाले, 'मला जसलीननं सांगितलं की तिला बिग बाॅसची आॅफर आलीय. पण तिला विचित्र जोडी बनून जायचंय. तिनं मला तिच्या बरोबर यायला सांगितलं. पण माझे म्युझिक शोज असल्यानं मी नकार दिला.' पुढे तेच म्हणाले की जसलीनच्या वडिलांनी त्या दोघांना म्युझिकल जोडी म्हणून जायला सांगितलं. त्यानंतर दोघंही जोडी म्हणून प्रसिद्ध झाले.

जसलीन मूळची मुंबईची आहे. तिचे वडील दिग्दर्शक आहेत. 28 वर्षांच्या जसलीने वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी संगीत शिकण्यास सुरूवात केली आणि वयाच्या 16व्या वर्षी तिने आंतर-महाविद्यालयीन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट महिला गायिकेचा पुरस्कार पटकावला होता.

तिनं डान्समध्ये क्लासिकल भरतनाट्यम आणि वेस्टर्नमध्ये हिप-हॉप, साल्सा आणि बेली डान्सिंग ट्रेनिंग घेतलंय. त्याचबरोबर तिनं याआधी गायक मिक्का सिंग, सुखविंदर सिंग, पॅपॉन आणि अमजद खान यासारख्या दिग्गजांसोबत तीन वर्ष जगभरात परफॉर्म केलंय.

तिनं डान्समध्ये क्लासिकल भरतनाट्यम आणि वेस्टर्नमध्ये हिप-हॉप, साल्सा आणि बेली डान्सिंग ट्रेनिंग घेतलंय. त्याचबरोबर तिनं याआधी गायक मिक्का सिंग, सुखविंदर सिंग, पॅपॉन आणि अमजद खान यासारख्या दिग्गजांसोबत तीन वर्ष जगभरात परफॉर्म केलंय.

Loading...

एका एपिसोडमध्ये जसलीन मथारूचे अनुप जलोटांसाठी असलेल्या प्रेमाची अग्नीपरीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत ती सपशेल नापास झाली. बिग बॉसने दिलेल्या एका टास्कमध्ये अनुप यांना नॉमिनेशनमधून वाचवण्यासाठी जसलीनला स्वतःचे केस, मेकअप आणि कपडे यांचा बळी द्यावा लागणार होता.

अर्जुन रामपालच्या आईचं निधन, दु:खात सहभागी झाली मेहर जेसिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 29, 2018 04:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...