मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अभिनेत्री एकटी असलेली पाहून ड्रायव्हरनं गाडीचा रस्ता बदलला आणि...

अभिनेत्री एकटी असलेली पाहून ड्रायव्हरनं गाडीचा रस्ता बदलला आणि...

रात्री शूटिंग संपवून घरी परतत असताना ती एकटी असल्याचा फायदा घेत तिच्या ड्रायव्हरनं गाडी निर्जन रस्त्यावर नेऊन थांबवली.

रात्री शूटिंग संपवून घरी परतत असताना ती एकटी असल्याचा फायदा घेत तिच्या ड्रायव्हरनं गाडी निर्जन रस्त्यावर नेऊन थांबवली.

रात्री शूटिंग संपवून घरी परतत असताना ती एकटी असल्याचा फायदा घेत तिच्या ड्रायव्हरनं गाडी निर्जन रस्त्यावर नेऊन थांबवली.

मुंबई, 29 जून : 'द कपिल शर्मा शो'मध्ये कपिल शर्माच्या त्याच्या आत्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री उपासना सिंहचा आज वाढिदवस आज 45 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या उपासनानं अनेक टीव्ही मालिका आणि बॉलिवूड तसेच पंजाबी सिनेमात काम केलं आहे. पण तिच्यासोबत एकदा एक भयंकर घटना घडली होती. रात्री शूटिंग संपवून घरी परतत असताना ती एकटी असल्याचा फायदा घेत तिच्या ड्रायव्हरनं गाडी निर्जन रस्त्यावर नेऊन थांबवली होती.

उपासना एकदा रात्री उशीरा शूटिंग संपवून हॉटेलवर परतत होती. पण अर्ध्या रस्त्यात तिच्या ड्रायव्हरनं ती एकटी असल्याचा फायदा घेत हॉटेलवर जायचं सोडून गाडी दुसऱ्याच रस्त्याला घेतली. जेव्हा उपसनाला जाणावलं की आता काहीतरी वाईट घडणार आहे तेव्हा तिने लगेच पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. ज्यानंतर पोलिसांनी त्या ड्रायव्हरला अटक केली होती.

पंजाबला शूटिंग करत होती उपासना

अभिनेत्री उपासना सिंहने तिच्या तक्रारीत सांगितलं होतं की, ती लांदरा येथे शूटिंगसाठी आली होती. या ठिकाणी ती चंदिगढ-अंबाला रोडवरील हॉटेल रमाडा येथे थांबली होती. तिथून ती तिच्या टीममधील अन्य लोकांसोबत शूटिंगसाठी लांदरा येथे गेली. पण त्याच रात्री तिला जीरकपूरला जायचं होतं. यावेळी तिचा टॅक्सी चालक विवेकनं कार जाणूनबुजून पीआर-7 रिंग रोडला घेतली. त्यावेळी रात्रीचे 10 वाजले होते आणि रस्ता अगदी निर्जन होता.

Sushant Singh Rajput: पोलीस शोधताहेत नवा अँगल,यशराजच्या Casting Directorची चौकशी

टॅक्सी चालकाचं हे वागणं पाहून उपसना घाबरली होती मात्र तिन लगेचच पोलिसांना फोन करून आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आणि पोलिसांनी त्या ठिकाणी वेळेत पोहोचत संबंधित टॅक्सी चालकाला ताब्यात घेतलं. प्रकरण वाढत जात असल्याचं लक्षात आल्यावर ड्रायव्हरनं माफी मागितली. ज्यानंतर उपासनानं तिची केस मागे घेतली होती.

First published:

Tags: Bollywood