मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'तर त्याचा प्रायव्हेट पार्ट मी...'; Splitsvillaमध्ये जाण्याआधीच उर्फी असं का म्हणाली?

'तर त्याचा प्रायव्हेट पार्ट मी...'; Splitsvillaमध्ये जाण्याआधीच उर्फी असं का म्हणाली?

उर्फी जावेद

उर्फी जावेद

उर्फी आता Splitsvillaया कार्यक्रमात सहभागी होत आहे. शोमध्ये जाण्याआधीच उर्फीनं मी त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून टाकेन, असं धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 07 डिसेंबर : आपल्या बोल्ड आणि विचित्र फॅशन स्टाइलमुळे कायम चर्चेत असलेली बिग बॉस फेम उर्फी जावेद कायम चर्चेत असते. उर्फी तिच्या कपड्यांवरून कितीही ट्रोल होत असली तरी तिच्यात कोणताही फरक पडतनाही. काही दिवासांआधीच चेतन भगत यांनी उर्फीवर टीका केली होती. तिच्या कपड्यांवरून तिला अनेकांनी खडेबोल सुनावले आहेत. सोशल मीडियावर उर्फीच्या बोल्डनेसचा कहर सुरूच असतो. पण आता तो बोल्डनेस आणि विचित्र फॅशन स्टाइल टेलिव्हिजनवर देखीला पाहावी लागणार आहे. कारण उर्फी आता Splitsvillaया कार्यक्रमात सहभागी होत आहे. या कार्यक्रमातील उर्फीचा पहिला व्हिडीओ समोर आलाय ज्यात ती मी त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून टाकेन, असं म्हणताना दिसत आहे. उर्फी असं का म्हणाली आणि कोणाला म्हणाली? जाणून घेऊया.

Splitsvilla हा हिंदी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय शो आहे.  Splitsvillaच्या इन्स्टाग्रामवर उर्फीचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.  या शोमध्ये देखील उर्फीचा बोल्ड लुक पाहायला मिळणार आहे.  Splitsvilla साठी उर्फीचं नाव अनेक दिवस चर्चेत होतं. अखेर ती आता या शोमध्ये दिसणार आहे.  उर्फीचा व्हिडीओ समोर आलाय ज्यात तिला काही प्रश्न विचारले आहेत. त्यातील एका प्रश्नाचं उत्तर देताना उर्फीनं तिच्या बेडरुम सीक्रेटविषयी सांगून टाकलं आहे.

हेही वाचा - Uorfi Javed Controversial Outfits : उर्फीच्या कपड्यांच्या छप्पन तऱ्हा, पाहा तिचे Top 10 बोल्ड लुक

'आर यू लाउड और क्वाइट इन बेड?', या प्रश्नाचं उत्तर देत उर्फीनं म्हटलंय, 'बेडवरच्या गोष्टी आपण बेडवर केल्या तर चांगलं होईल. पण तरीही तुम्हाला माझ्या बेडरूममध्ये एवढा रस असेल तर तुम्हीच माझ्या वेडवर या'.  इतकंच नाही तर तिला विचारण्यात आलं, 'तो माणूस जर तुला धोका देत असेल तर तू त्याच्याबरोबर राहशील का?' यावर उर्फीनं म्हटलं, 'मला धोका देणाऱ्या माणसाचा प्रायव्हेट पार्ट मी कापून टाकेन'. उर्फीचं हे उत्तर ऐकून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

इतकंच नाही तर उर्फीनं या शोमध्ये जाताना थेट सनी लिओनीला देखील चँलेंज दिलं आहे. उर्फीनं म्हटलंय, मी खूप रोमँटिक आहे आणि Splitsvilla हा प्रेमाचा शो आणि म्हणूनच मी तिथे जाण्यासाठी उत्सुक आहे. सनी तू माझ्याशी स्पर्धा करू शकतेस पण माझ्या कपड्यांशी स्पर्धा करू शकत नाही. उर्फी Splitsvilla

First published:

Tags: Bollywood, Bollywood News, Urfi Javed