मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Uorfi Javed : 'बलात्कार करणाऱ्यांवर बहिष्कार का नाही?', Boycott Bollywood ट्रेंडवर उर्फी जावेदची संतप्त प्रतिक्रिया

Uorfi Javed : 'बलात्कार करणाऱ्यांवर बहिष्कार का नाही?', Boycott Bollywood ट्रेंडवर उर्फी जावेदची संतप्त प्रतिक्रिया

बॉलिवूडमध्ये सध्या आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा सिनेमावरुन बायकॉट बॉलिवूड ट्रेंड होत आहे. यावर उर्फीनं तिची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा सिनेमावरुन बायकॉट बॉलिवूड ट्रेंड होत आहे. यावर उर्फीनं तिची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा सिनेमावरुन बायकॉट बॉलिवूड ट्रेंड होत आहे. यावर उर्फीनं तिची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

  मुंबई,  19 ऑगस्ट:  अभिनेत्री मॉडेल उर्फी जावेद तिच्या चित्र विचित्र कपड्यांमुळे आणि फॅशनमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरते. अनेक वेळा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र तिचा फॅशन सेंस आजवर बदलेला दिसला नाही. अनेकांनी उर्फीला मुर्खात काढत तिला वाईट शब्दांत ट्रोल केलं. मात्र त्याच उर्फीनं आज मीडियासमोर एक महत्त्वाचा आणि रोखठोक सवाल केला आहे. तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  बॉलिवूडमध्ये सध्या आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा सिनेमाला बायकॉट करण्यावरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. याविषयी उर्फीला तिचं मत विचारलं असता उर्फीनं बॉलिवूडला पाठिंबा देत एक गंभीर प्रश्न ट्रेलर्स आणि बॉलिवूडला बायकॉट करणाऱ्यांना विचारला आहे. बॉलिवूडच्या सिनेमांना बायकॉट केलं जात आहे यावर तुझं मत काय असा प्रश्न उर्फीला विचारला असता त्यावर उर्फीनं संतप्त प्रतिक्रिया दिली. उर्फी म्हणाली, 'का दरवेळी बॉलिवूडला बायकॉट करायचं आहे. तुम्ही रेपिस्ट्स बलात्कार करणाऱ्यांना का कधी बॉयकॉट करत नाही.  बलात्कार करणाऱ्या इतक्या मोठ्या अपराध्यासाठी बायकॉट लागू होन नाही का? बलात्कार करणाऱ्या नराधमांसाठी कधी बायकॉटची लाट आलेली पाहायला मिळत नाही. त्यांच्याबाबतीत जर अशी ठोस पाऊलं उचलली असती तर क्रिमनल्सनी अशी पावलं उचललीच नसती'. हेही वाचा -  'और कितना गिरोगी'; पडता पडता वाचली Uorfi javed, पाहा VIDEO उर्फीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. उर्फी नेहमीच सर्वांना बावळट किंवा सेंस नसलेली मुलगी वाटत आली आहे मात्र आज तिनं विचारलेल्या प्रश्नांमुळे उर्फीची वेगळी बाजू सर्वांसमोर आली आहे.  उर्फीनं बॉयकॉट बॉलिवूडची तिची प्रतिक्रिया दिली खरी पण त्यानंतर मात्र तिला पुन्हा एकदा ट्रोलिंगचा सामान करावा लागतो आहे.
  बलात्कार करणाऱ्यांना बायकॉट का करत नाही या उर्फीच्या प्रतिक्रियेनंतर तिला अनेकांनी ट्रोल केलं आहे. ट्रोलर्सनी म्हटलं आहे की, 'आता उर्फीलाच बायकॉट करण्याची वेळ आली आहे'.  तर काही युझर्सनी उर्फीच्या वक्तव्याचं समर्थन करत तिला सपोर्ट केला आहे. काही दिवसांआधीच अभिनेत्री अर्जुन कपूरनं बॉलिवूड बायकॉवर प्रतिक्रिया देत, 'आता ट्रोलर्सचं ऐकून घ्यायचं नाही. यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे', असं म्हटलं. अर्जुनच्या या वक्तव्यानंतर त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News

  पुढील बातम्या