मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

रुग्णालयात दाखल होती Uorfi Javed; आता समोर आली हेल्थ अपडेट

रुग्णालयात दाखल होती Uorfi Javed; आता समोर आली हेल्थ अपडेट

अभिनेत्री उर्फी जावेद (Uorfi Javed) स्टाइल, फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. तिच्या अफलातून फॅशनमुळे ती नेहमीच नेटकऱ्यांना थक्क करत असते.

  • Published by:  Sayali Zarad
मुंबई, 11 ऑगस्ट : अभिनेत्री उर्फी जावेद (Uorfi Javed) स्टाइल, फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. तिच्या अफलातून फॅशनमुळे ती नेहमीच नेटकऱ्यांना थक्क करत असते. उर्फीला तर आता फॅशन आयकॉन म्हणायला सुरुवात केली आहे. प्रत्येक वेळी नवीन आणि बोल्ड लुक घेऊन उर्फी समोर येत असते. अशातच उर्फी जावेदची प्रकृती बिघडल्याची बातमी समोर आली होती. गेल्या काही दिवसांपासून उर्फीची प्रकृती ठीक नाहीये. अशातच उर्फीनं तिच्या प्रकृतीविषयी अपडेट दिली आहे. उर्फीनं तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत तिच्या प्रकृतीविषयी अपडेट शेअर केली आहे. उर्फीनं म्हटलं की, 'मी एकदम ठीक आहे. आता मला डिस्चार्ज मिळाला आहे. बरं झालं आता मला बरं वाटतंय. सगळ्यांना खूप सारं धन्यवाद इतक्या सगळ्या लोकांनी मला बरं होण्याची विष केलं'. उर्फीला बरं वाटू लागल्यानंतर तिनं लगेच तिचे काही जुने व्हिडीओ स्टोरी शेअर केले. हेही वाचा -   Rakshabandhan 2022: सोनमचं रक्षाबंधन स्पेशल; 'बालपण ते लग्न' अभिनेत्रीने शेअर केले भावंडांसोबतचे Unseen Photo गेल्या काही दिवसांपासून उर्फीला उलट्यांचा त्रास होत होता. तिला 103 ते 104 डीग्री ताप आला, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. या बातमीमुळे उर्फीचे चाहते चिंतेत पडले होते. उर्फीची तब्येत अचानक बिघडल्याने तिला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता उर्फीची प्रकृती ठीक असून तिनं स्वतःच याविषयी माहिती दिली आहे. दरम्यान, बिग बाॅस ओटीटीमुळे उर्फी घराघरात पोहोचली. तिच्या फॅशन्स नेहमीच चर्चेचा विषय ठरल्यात. बिग बॉसनंतर उर्फी मोठ्या प्रमाणावर प्रकाश झोतात आली. उर्फीनं बिग बॉसच्या पहिले बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे.
First published:

Tags: Entertainment, Fashion, Health, Tv actress

पुढील बातम्या