मुंबई,30 डिसेंबर- बॉलिवूड (Bollywood) कलाकार सतत आपल्या बालपणीचे फोटो (Childhood Picture) शेअर करून आपल्या आठवणींना उजाळा देत असतात. तर बऱ्याचवेळा या कलाकारांचे चाहते त्यांचे कधीही न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशाच एका प्रसिद्ध कलाकाराच्या बालपणीचा फोटो सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. हा फोटो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. पाहा तुम्हाला ओळखतो का तुमचा हा लाडका अभिनेता..
या फोटोमध्ये दिसणारा छोटासा गोंडस मुलगा आज बॉलिवूडचा सर्वात हँडसम अभिनेता म्हणून ओळखला जातो. या अभिनेत्यावर लाखो तरुणी जीव ओवाळून टाकतात. हा अभिनेता दुसरा कोणी नसून हृतिक रोशन (Hrithik Roshan) आहे.वाटलं ना आश्चर्य? हो हा छोटा मुलगा हृतिक रोशन आहे. हृतिक रोशन एक हँडसम अभिनेता तर आहेच. शिवाय त्याचा अभिनयही उत्कृष्ट आहे. त्याने विविध चित्रपटांत वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. हृतिक रोशन हा एक उत्तम डान्सरसुद्धा आहे. त्याच्या हुक स्टेप आजही तितक्याच जबरदस्त समजल्या जातात. हृतिक रोशन फिटनेस फ्रिक अभिनेता आहे. तो सतत जिममध्ये घाम गाळताना दिसून येतो. वयाच्या चाळीशीतही त्याचा फिटनेस नवख्या अभिनेत्यांना टक्कर देतो.मँगो बॉलिवूड या सोशल मीडिया पेजवर हृतिकचा हा फोटो शेअर करण्यात आला होता.
हृतिक रोशनचा जन्म १० जानेवारी १९७४ मध्ये मुंबईमध्ये झाला होता. हृतिक रोशन हा प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माता राकेश रोशन यांचा मुलगा आहे. त्यामुळे घरातूनच त्याला अभिनयाचा वारसा मिळाला आहे. हृतिक रोशनने २००० साली आलेल्या 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. तसेच या चित्रपटातील गाणीही प्रचंड हिट ठरली होती. आजही अनेक लोक या गाण्यांना आवडीने ऐकतात. या चित्रपटात हृतिकसोबत अमिषा पटेल होती. या चित्रपटासाठी अभिनेत्याने प्रचंड कष्ट घेतेले होते. चित्रपटासाठी त्याने डान्स, तलवारबाजी, घोडेस्वारी अशा विविध गोष्टींचं ट्रेनिंग घेतलं होतं.
View this post on Instagram
हृतिक रोशनने ज्येष्ठ दिवंगत अभनेता फिरोज खान यांची मुलगी सुजैन खान हिच्याशी लग्न केलं होतं. दीर्घकाळ संसार केल्या नंतर दोघांनी घटस्फोट घेतला आहे. या जोडप्याला दोन मुले आहेत. आपल्या मुलांसाठी आजही ते एकेमकांसोबत मित्रांसारखे राहतात. अभिनेत्री कंगना रणौत, बार्बरा मोरी अशा विविध अभिनेत्रींसोबत त्याच्या अफेयरच्या चर्चा झाल्या होत्या. त्यानंतरच त्याच्या पत्नीसोबतचं त्याचं नातं बिघडल्याचं म्हटलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Hritik Roshan