उन्नाव रेप केस : 'ट्विंकल खन्नाच्या 'या' ट्वीटमुळे खिलाडी अक्षय कुमार ट्रोल

उन्नाव रेप केस : 'ट्विंकल खन्नाच्या 'या' ट्वीटमुळे खिलाडी अक्षय कुमार ट्रोल

उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणावर ट्विंकलनं असं काय ट्वीट केलं ज्यामुळे अक्षय कुमारला ट्रोलर्सनी टार्गेट केलं.

  • Share this:

मुंबई, 31 जुलै : उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यात झालेल्या सामुहिक बलात्कार पीडितेचा नुकताच अपघात झाला. या प्रकरणी आरोपी आणि भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोशल मीडियावर यासंबंधीत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याचप्रकरणी अभिनेत्री पायल रोहतगीने एक व्हिडिओ शेअर करत आमदार कुलदीप सिंह सेंगर यांचं समर्थन केल्यामुळे ती खूप ट्रोल झाल्यानंतर आता अभिनेता अक्षय कुमारला सुद्धा पत्नी ट्विंकल खन्नाच्या ट्वीटमुळे ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे.

ट्विंकल खन्नानं तिच्या ट्वीटमध्ये या पीडितेला न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली होती. तिनं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘मी प्रार्थना करते की, या मुलीला न्याय मिळो. हे खरंच खूप भयंकर आहे आणि ज्यावेळी ट्रकच्या नंबर प्लेटवर जळमटं लागलेली असणं आणि ती स्पष्ट न दिसणं हा यावरून स्पष्ट होतं की तो योगायोग नव्हता.’ ट्विंकलच्या या ट्वीटवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण यातील सर्वाधिक लोकांनी ट्विंकलचा पती आणि अभिनेता अक्षय कुमारला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. लोक या गोष्टीवर नाराज आहेत की, ट्विंकलनं ट्वीट केलेलं असताना अक्षयनं मात्र या प्रकरणावर अद्याप चकार शब्दही काढलेला नाही आणि याच मुद्द्यावरून आता अक्षयवर टीका होत आहे.

उन्नाव बलात्कार पीडितेच्या अपघातात अभिनेत्रीने केलं भाजप आमदाराचं समर्थन

एका युजरनं लिहिल, अक्षयनं या पीडितेला पाठींबा दिला असता तर खूप चांगलं झालं असतं. मला पूर्वी अक्षय आवडत असे. मात्र मागच्या काही वर्षांपासून त्यानं स्वतःहूनच स्वतःला डीग्रेड केलं आहे. तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, तुम्ही ट्वीट व्यतिरिक्त आणखी काय करु शकता मॅडम, जास्त ट्वीट करु नका नाहीतर तुमच्या नवऱ्याला ‘मिशन मंगल’साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळणार नाही. याशिवाय इतर युजर्सनी सुद्धा पुन्हा एकदा अक्षयच्या कॅनडाच्या नागरिकत्वाचा मुद्दा घेऊन त्याच्यावर निशाणा साधला आहे.

प्रियकराच्या निधनातून सावरतेय संजय दत्तची मुलगी, म्हणाली...

अशाप्रकारे ट्रोल होण्याची ही अक्षयची पहिली वेळ नाही. याआधी लोकसभा निवडणुकांच्या वेळी अक्षय कुमारनं मतदान न केल्यानं त्याच्या भारतीय नागरिकत्वावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यानंतर अक्षयला कोणत्याही गोष्टीसाठी याच मुद्द्यावरून ट्रोल केलं जातं. विषय कोणताही असो प्रत्येकवेळी ट्रोलर्सची गाडी मात्र अक्षयच्या कॅनडाच्या नागरिकत्वावरच येऊनच थांबते. मात्र अक्षय नेहमीच या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करुन देशाप्रती आपल्या जबाबदाऱ्या पार पाडताना दिसतो.

Sacred Games 2 च्या टीझरमध्ये गणेश गायतोंडेने विचारला 'हा' अफलातून प्रश्न

=================================================================

VIDEO : बच्चेकंपनी ती बच्चेकंपनी, निघाली नादखुळा एक्स्प्रेस!

First published: July 31, 2019, 11:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading