अमिताभ बच्चन यांच्या Jalsa मध्ये झालंय या प्रसिद्ध चित्रपटांचं शूटिंग, बंगल्याची किंमत ऐकून व्हाल थक्क

अमिताभ बच्चन यांच्या Jalsa मध्ये झालंय या प्रसिद्ध चित्रपटांचं शूटिंग, बंगल्याची किंमत ऐकून व्हाल थक्क

जलसा बंगला अनेक चित्रपटांचा तो साक्षीदार आहे. खुद्द बिग बींनीच या गोष्टीचा खुलासा केला आहे. मुंबईच्या जुहू येथील हा अलिशान बंगला मुंबईतील महागड्या वास्तूंपैकी एक आहे.

  • Share this:

मुंबई, 21 एप्रिल : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan)  यांचा मुंबईतील अलिशान बंगला ‘जलसा’ (Jalsa)  अनेकदा चर्चेत येतो. त्याप्रमाणे या बंगल्याचा फार मोठा इतिहास देखील आहे. अनेक चित्रपटांचा तो साक्षीदार आहे. खुद्द बिग बींनीच या गोष्टीचा खुलासा केला आहे. मुंबईच्या जुहू येथील हा अलिशान बंगला मुंबईतील महागड्या वास्तूंपैकी एक आहे. याचबरोबर अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा खुलासा अमिताभ बच्चन यांनी केला आहे.

अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांच संपूर्ण कुटुंब या बंगल्यात राहतं. जया बच्चन (Jaya Bacchan) , अभिषेक बच्चन (Abhishek Bacchan) , ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bacchan)  आणि नात आराध्या बच्चन. अमिताभ यांनी आपल्या या राहत्या घराची एक आठवण सांगितली आहे. ती म्हणजे त्यांचे अनेक चित्रपट त्यांच्या याच घरात चित्रित झाले होते. त्यात आनंद (Anand), नमक हराम (Namak haram), चुपके चुपके, सत्ते पे सत्ता आणि आणखी बऱ्याच चित्रपटांचा त्यात समावेश आहे.

नुकतेच बिग बींच्या चुपके चुपके चित्रपटाला 46 वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे त्यांनी चित्रपटाशी निगडीत काही आठवणींना उजाळा दिला. त्यांनी एका पोस्ट मध्ये याविषयी लिहिताना म्हटलं, 'चुपके चुपके हा माझा आणि ऋषिकेश मुखर्जींचा चित्रपट आता 46 वर्षे पूर्ण करत आहे... या फोटोतील जे घर तुम्ही पाहत आहात ते एन सी सीप्पींच (NC Sippy) आहे. आम्ही ते खरेदी केल, विकल आणि पुन्हा खरेदी केलं. त्यांच नुतनीकरण केलं आणि हे आता आमचं घर जलसा आहे'. अमिताभ बच्चन यांचा जलसा हा बंगला पूर्वी निर्माते एन सी सीप्पींचा होता. बिग बींनी तो नंतर विकत घेतला होता.

जलसा या बंगल्याच पूर्वीचं नाव जलसा मसून मनसा होतं. तर हे सिक्रेट देखिल बिग बींनीच सांगितल होतं. बच्चन कुटुंबाने नंतर त्याचं नामकरण करत जलसा हे नाव ठेवलं. मुंबतील जुहू सारख्या उच्चभ्रू ठिकाणी असलेल्या या अलिशान बंगल्याची किंमत ही तितकीच भारी भक्कम आहे. 100 ते 120 कोटी रुपये या बंगल्याची किंमत आहे. तर 10,125 स्के फूट वर या बंगला उभा आहे.

(हे वाचा-'पद्मावत'नंतर शाहिद कपूर आणखी एका पौराणिक चित्रपटासाठी सज्ज; साकारणार मोठी भूमिका)

जलसा बंगल्याच्या मागे लहानशी लॉन आहे. तिच नाव मात्र मनसाच आहे. एका वृत्तानुसार अनेक वर्षे हा बंगला बिग बींच्या नावावर नव्हता. तर हा बंगला अमिताभ बच्चन यांचा भाऊ अजिताभ बच्चन यांची पत्नी रमोला बच्चन यांच्या नावावर होता. 2006 साली इनकम टॅक्सच्या काही बाबींमुळे तो जया बच्चन यांच्या नावावर करण्यात आला.

Published by: News Digital
First published: April 21, 2021, 5:11 PM IST

ताज्या बातम्या