मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /नवा प्रवास म्हणत सायकलवर झाला स्वार; कुठे निघालाय Umesh Kamat?

नवा प्रवास म्हणत सायकलवर झाला स्वार; कुठे निघालाय Umesh Kamat?

अभिनेता उमेश कामतने (Umesh Kamat) आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अभिनेता उमेश कामतने (Umesh Kamat) आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अभिनेता उमेश कामतने (Umesh Kamat) आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मुंबई, 29 स्पटेंबर : मराठमोळा अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. नुकतंच त्याने आपले काही फोटो शेअर केले आहेत (Umesh Kamat photo). ज्यात तो सायकलवर स्वार झालेला दिसतो आहे. डोक्यावर हेल्मेट, डोळ्यावर गॉगल आणि तपकिरी रंगाचं जॅकेट असा त्याचा लूक आहे. नवीन व्यक्तीरेखा (Umesh Kamat film) आणि नवा प्रवास अशा कॅप्शनसह त्याने हा फोटो पोस्ट केला आहे (Umesh Kamat serial).

या फोटोच्या माध्यमातून उमेशने त्याच्या आगामी प्रोजेक्टविषयी माहिती दिली आहे. अलिबाबा आणि चाळीशीतले चोर असं या आगामी सिनेमाचं नाव आहे. त्यातला हा फोटो आहे. यापूर्वी याच सिनेमाच्या सेटवरचा अभिनेत्री मधुरा वेलणकरसोबतचा फोटो उमेशने शेअर केला होता. हे दोघंही कॉलेजपासूनचे बेस्टट फ्रेंड आहेत आणि या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र काम करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

उमेशचा हा लूक सर्वांना आवडला आहे. कोणत्याही लूकमध्ये हॅण्डसम दिसतोस अशा कमेंट या फोटोवर आल्या आहेत.

हे वाचा - 'आई कुठे काय करते' - देशमुखांकडे वाजणार सनई चौघडे; अनघाचा मंगळसूत्र लूक व्हायरल

सध्या उमेश कामत अजूनही बरसात आहे या मालिकेत आदिराजची भूमिका साकारत आहे. या मालिकेत देखील त्याच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. या मालिकेत त्याची आणि मुक्ता बर्वेची जोडी रसिकांना खूप आवडत आहे. मुक्ता आणि उमेश देखील सेटवरचे अनेक मजेशीर व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. काही दिवसापूर्वी त्यांनी एका ट्रेंडिंग म्युझिकवर रिल शेअर केला होता. मीरा-आदिराजचा हा इन्स्टा अवतार चाहत्यांना खूप आवडला होता.हा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

हे वाचा - नवी मालिका नवी नायिका: 'ठिपक्यांची रांगोळी'तली ज्ञानदा रामतीर्थकर कोण आहे?

यासोबतच यंदा उमेशचा त्याची पत्नी प्रिया बापट हिच्यासोबत आणि काय हवं याचा तिसरा सीजन देखील आला आहे. यावर देखील चाहत्यांनी भरभरून प्रेम केले आहे. आता उमेशचा हा नवीन सिनेमा देखील प्रेक्षकांचे मन नक्की जिंकेल असं दिसत आहे.  त्यामुळे चाहत्यांना देखील उमेशच्या या नव्या सिनेमाची उत्सुकता लागली आहे.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Marathi cinema, Marathi entertainment, Tv serial