मुंबई, 6 आॅक्टोबर : असंभव, वादळवाट या गाजलेल्या मालिकांतून घराघरांत पोचलेला अभिनेता उमेश कामत एक चाॅकलेट हिरो म्हणून सगळ्यांना माहीत आहे. उमेश आपल्या फिटनेससाठी एकदम जागरुक आहे. तो फिटनेससाठी नक्की काय करतो हे त्याने खास न्यूज१८ लोकमतला सांगितलं. त्याचं फिटनेससाठीचं वेड पाहून तुम्हीही फिटनेस फ्रिक व्हाल.
फिटनेस काळाची गरज
सध्या आपण सगळेच बऱ्याच तणावांना सामोरं जात असतो. रॅट रेसमध्येही असतोच. अशा वेळी माझे फिटनेस गुरू शैलेश परुळेकर सांगतात, शारीरिक आणि मानसिक फिटनेस दोन्ही महत्त्वाचा असतो. कलाकारांसाठी फ्लेक्झिबिलिटी महत्त्वाची असते. तणाव कमी करण्यासाठी जसे मेडिटेशन हवं, तसा शारीरिक व्यायामही हवा.
रोज 1 तास स्वत:साठी
मी अनेकदा भूमिकेच्या गरजेप्रमाणे व्यायाम करतो. आऊटडोअरला असतो तेव्हा सायकलिंग, चालणं, जाॅगिंग करतो.
खेळाची आवड
मला मैदानी खेळ आवडतात. तसंच मी टेबल टेनिसही करतो. खेळामुळेही शरीर तंदुरुस्त राहतं.
जिममध्ये जातो
मी चेंबुरहून कांदिवलीला जिमसाठी जातो. शैलेश परुळेकरांची जिम तिथे आहे. त्यांनीच मला सांगितलंय, तुम्हाला जेव्हा लो वाटतं, तेव्हा तुम्हा काॅर्डिओ करा आणि आत्मविश्वास कमी वाटला, तर वेट लिफ्टिंग करा. वाॅर्म अप, वेट लिफ्टिंगही महत्त्वाचं.
मेडिटेशन
मी रोज 10 मिनिटं मेडिटेशन करतो. थोडा काळ फोनपासून दूर राहतो.
आहार
शक्यतो आहारात तेलकट, गोड पदार्थ खात नाही. मैदा तर खातच नाही. या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
झोप
प्रत्येकाला 8 तास झोप मिळाली पाहिजे. शूटिंगच्या वेळा कधी आॅड असतात. मग मी मध्ये मध्ये झोप काढतो.
गडकरी म्हणतात, 'पवारसाहेब कधी काय बोलतील आणि काय करतील याचा नेम नाही'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Actor, Fitness funda, Umesh kamat, उमेश कामत, फिटनेस फंडा