Home /News /entertainment /

कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये युक्रेनियन महिलेचं `Topless` आंदोलन, रशियाशी आहे खास कनेक्शन

कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये युक्रेनियन महिलेचं `Topless` आंदोलन, रशियाशी आहे खास कनेक्शन

सध्या जगभरात कान फिल्म फेस्टिव्हलची (Cannes Film Festival) जोरदार चर्चा आहे.त्यातच या फिल्म फेस्टिव्हलमध्ये एका महिलेनं टॉपलेस (Topless) आंदोलन केल्याचं समोर आलं आहे.

    पॅरिस, 22 मे- सध्या जगभरात कान फिल्म फेस्टिव्हलची (Cannes Film Festival) जोरदार चर्चा आहे. येथील रेड कार्पेटवरील सेलेब्रिटींचा लूक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्यातच या फिल्म फेस्टिव्हलमध्ये एका महिलेनं टॉपलेस (Topless) आंदोलन केल्याचं समोर आलं आहे. रशियन सैन्याच्या कृत्याचा निषेध करण्यासाठी एक युक्रेनियन महिला फेस्टिव्हलमध्ये टॉपलेस अवस्थेत दाखल झाली. या अचानक घडलेल्या घटनेमुळे फेस्टिव्हलमध्ये काहीसा गोंधळ निर्माण झाला. सुरक्षा रक्षकांनी तत्परतेनं या महिलेला कार्यक्रमापासून दूर नेलं. कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये एका युक्रेनियन महिलेनं (Ukrainian women) कॅमेऱ्यासमोर टॉपलेस होत रशियन आक्रमणाचा निषेध केला. रशियन सैनिकांच्या अत्याचाराविरोधात `आमच्यावर बलात्कार करणं थांबवा`, असा संदेश तिनं संपूर्ण अंगावर लिहिला होता. ही महिला आंदोलन करतेवेळी जखमीही झाली. कान फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर देश आणि परदेशातल्या सिनेसृष्टीशी संबंधित सेलेब्रिटी आपल्या ग्लॅमरची झलक दाखवत असताना, अचानक ही महिला कॅमेऱ्यासमोर टॉपलेस अवस्थेत आली. तिनं शरीरावर युक्रेनच्या राष्ट्रध्वजाचं (National flag of Ukraine) चित्र रेखाटलं होतं आणि त्यावर `स्टॉप रेपिंग अस` असा संदेश लिहिला होता. सुरक्षारक्षकांची नजर पडण्यापूर्वीच तिनं सर्वांचं लक्ष आपल्याकडं वेधलं होतं. सुरक्षारक्षकांनी महिलेला चारही बाजूंनी कव्हर करत तिला तेथून बाहेर काढलं. मात्र, उपस्थित कॅमेरामननी संपूर्ण घटना टिपली. या महिलेनं तिच्या पाठीवर रशियाचे लष्कर (Russian army) आणि राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांच्याविषयी अपशब्दही लिहिले होते. वाचा-'या' तीन मुलांमध्ये उभा आहे महाराष्ट्राचा लोकप्रिय अभिनेता; ओळखलात का कोण? ``रशियन सैनिक त्यांनी ताब्यात घेतलेल्या प्रदेशातल्या मुली आणि महिलांवर बलात्कार करत आहेत,``असा आरोप युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी केला आहे. मंगळवारी झालेल्या कान फिल्म फेस्टिव्हलच्या उदघाटन समारंभात झेलेन्स्की यांनी युक्रेनला मदत करण्याचं आवाहन केलं. युद्धाच्या पार्श्वभूमीवर बनवण्यात आलेल्या `मारियुपोलिस 2` या माहितीपटाचे स्पेशल स्क्रिनिंग गुरुवारी पार पडलं. अशाप्रकारे कानमध्ये रशियाचं युक्रेनवरील आक्रमण हा एक महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा ठरला. गेल्या तीन महिन्यांपासून युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. आमच्या सैन्यानं युक्रेनमधील मारियुपोल शहर (Mariupol City) पूर्णपणे ताब्यात घेतल्याचा दावा रशियाने केला आहे. युक्रेनचं हे बंदराचं शहर युद्धात पूर्णपणे उद्धवस्त झालं आहे. शहरात चोहीकडं पडक्या इमारती आणि जळालेली वाहनं दिसत आहेत. मारियुपोलमध्ये आतापर्यंत 20,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. एएफपी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांनी रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांना मारियुपोलमधल्या अजोव्स्टल स्टील प्लांटबद्दल आणि शहराला संपूर्णपणे मुक्त केल्याविषयी माहिती दिली.
    First published:

    Tags: Entertainment, Hollywood

    पुढील बातम्या