गळाभेट अक्षयकुमारची, चर्चा मात्र उदयनराजेंची !

गळाभेट अक्षयकुमारची, चर्चा मात्र उदयनराजेंची !

सातारा जिल्ह्यातील पिंपोडे बुद्रुक या गावात अक्षयकुमार च्या केसरी चित्रपटाचं सध्या चित्रीकरण सुरू आहे.

  • Share this:

सातारा, 12 एप्रिल : खिलाडी अक्षयकुमार सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगसाठी साताऱ्यात आहे. यावेळी साताऱ्याचे खासदार उदयनाराजे भोसलेंनी अक्षय कुमारची भेट घेतली. या भेटीत सेटवरील कलाकारांनी सेटवर "एक नेता, एक आवाज...उदयन महाराज" अशा घोषणा दिल्या.

सातारा जिल्ह्यातील पिंपोडे बुद्रुक या गावात अक्षयकुमार च्या केसरी चित्रपटाचं सध्या चित्रीकरण सुरू आहे. अक्षय कुमारनं या गावातील लोकांबरोबर त्याने पाणी फाऊंडेशन साठी श्रमदान केलं होतं.

या कार्यक्रमादरम्यान अनेक जण अक्षयला भेटण्यासाठी आतुर होते.  याच अक्षयकुमार ला भेटण्याची इच्छा साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांना देखील झाली आणि त्यांनी थेट केसरी या चित्रपटाच्या सेट वर धडक मारली.

यावेळी अक्षयकुमारची खासदारांनी गळाभेट घेत चर्चा देखील केली. अक्षयकुमारनं देखील खासदारांशी बराच वेळ गप्पा मारल्या. यानंतर या सेट वरून निघालेल्या खासदार उदयनराजे यांना भेटण्यासाठी सेट वरच्या कलाकारांनी एकच गर्दी केली होती. एक नेता एक आवाज उदयन महाराज...उदयन महाराज अशा घोषणांनी सेट हादरून गेला.

एकूणच काय देशभर अक्षयकुमार या अभिनेत्याची क्रेझ असली तरी साताऱ्यात मात्र खासदार उदयनराजेची चाहत्यांची संख्या कमी नाही हेच म्हणावे लागेल.

First published: April 12, 2018, 7:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading