अपघातात दोन टीव्ही अभिनेत्रींचा मृत्यू, तर दोन गंभीर जखमी

अपघातात दोन टीव्ही अभिनेत्रींचा मृत्यू, तर दोन गंभीर जखमी

सिनेसृष्टीत आपलं नाव व्हावं हे स्वप्न उराशी बाळगून या दोन अभिनेत्रींनी त्यांच्या करिअरला टीव्ही मालिकेतून सुरुवात केली होती.

  • Share this:

हैदराबाद, १८ एप्रिल- दाक्षिणात्य टीव्ही जगतासाठी वाईट बातमी आहे. रिपोर्ट्सनुसार, एका कार अपघातात दोन टीव्ही अभिनेत्रींचा मृत्यू झाला. मालिकेचं चित्रीकरण संपवून अभिनेत्री घरी परतत असताना हा अपघात झाला. बिझनेस स्टँडर्डने छापलेल्या रिपोर्टनुसार अपघातात मृत पावलेल्या अभिनेत्रींचं नाव अनुषा रेड्डी आणि भार्गवी आहे. दोघी हैदराबादमध्ये चित्रीकरण संपवून घरी परतत होत्या. बुधवारी सकाळी विकाराबाद येथे ही घटना घडली.

रिपोर्टनुसार, अचानक गाडीच्या समोर ट्रक आल्याने हा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे. समोरून येणाऱ्या ट्रकपासून स्वतःला वाचवण्यासाठी अभिनेत्रीने आपली गाडी बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. पण गाडीवरचं तिचं नियंत्रण सुटलं आणि गाडी झाडाला जाऊन आदळली. या अपघातात दोन अभिनेत्रींचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असलेल्या आणखी दोन अभिनेत्री गंभीर जखमी आहेत. गाडीतून एकूण चार अभिनेत्री प्रवास करत होत्या.

मृत पावलेल्या अभिनेत्रींपैकी भार्गवी २० तर अनुषा २१ वर्षांची होती. तमिळ सिनेसृष्टीत आपलं नाव व्हावं हे स्वप्न उराशी बाळगून या दोन अभिनेत्रींनी नुकतीच त्यांच्या करिअरला टीव्ही मालिकेतून सुरुवात केली होती. भार्गवी टीव्ही मालिका मुत्याला मुग्गूमध्ये नकारात्मक भूमिका साकारत होती. तर अनुषाही छोट्या पडद्यावर सक्रीय होती.

VIDEO: दुसऱ्या टप्प्यातील मतदान; प्रणिती शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

First published: April 18, 2019, 9:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading