S M L

अमिताभ बच्चन यांनी दिली ट्विटर सोडून जाण्याची धमकी!

सोशल मीडियासाठी अनेक साईड्स आहेत आणि त्यात सगळ्यात ट्रेंडिंग म्हणजे ट्विटर. सध्या ट्विटरवर फॉलोअर्ससाठी बॉलिवूडच्या दोन दिग्गजांमध्ये भांडण सुरू आहेत.

Sachin Salve | Updated On: Feb 1, 2018 02:44 PM IST

अमिताभ बच्चन यांनी दिली ट्विटर सोडून जाण्याची धमकी!

01 फेब्रुवारी : सोशल मीडियासाठी अनेक साईड्स आहेत आणि त्यात सगळ्यात ट्रेंडिंग म्हणजे ट्विटर. सध्या ट्विटरवर फॉलोअर्ससाठी बॉलिवूडच्या दोन दिग्गजांमध्ये भांडण सुरू आहेत. अभिनेता शाहरुख खानचे ट्विटर फॉलोअर्स सध्या खूप वाढले आहेत. ट्विटवर तो एक नंबरला आहे. भारतात फॉलोअर्समध्ये नरेंद्र मोदींनंतर शाहरुखचाच नंबर लागतो. पण यात बॉलिवूडचे बादशहा अमिताभ बच्चन यांचे फॉलोअर्स मात्र कमी झाले आहेत. आणि म्हणून त्यांनी ट्विटर सोडून देण्याची धमकी दिली आहे.

शाहरुखच्या फॉलोअर्सची ही बातमी सोशल मीडियावर पसरताच अमिताभ बच्चन यांनी असं काही ट्विट केलं की सगळ्यांना धक्काच बसला. ट्विटरने अमिताभ बच्चन यांचे फॉलोअर्स कमी केले आहेत. आणि याचाच त्यांना राग आला. हा राग त्यांनी ट्विट करुन व्यक्त केला. आणि ट्विटर सोडून जाईन अशी ट्विटरलाच धमकी दिली.

Loading...
Loading...

खरं तर ट्विटरवर फॉलोअर्सची संख्या कमी जास्त होत असते. शाहरूख आणि अमिताब बच्चन यांचे एकूण 3 कोटी 29 लाख इतके फॉलोअर्स आहेत. अमिताभ यांच्या या ट्विटमुळे त्यांचे फॉलोअर्स वाढणार का याकडेच सगळ्यांच लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 1, 2018 02:44 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close