रानू मंडल झाल्या फेमस, मुलगी मात्र नेटिझन्सच्या निशाण्यावर, म्हणाले...

रानू मंडल झाल्या फेमस, मुलगी मात्र नेटिझन्सच्या निशाण्यावर, म्हणाले...

एकीकडे सोशल मीडियावर रानू यांच्या टॅलेंटचं कौतुक केलं जात आहे तर दुसरीकडे मात्र त्यांची मुलगी ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

  • Share this:

मुंबई, 31 ऑगस्ट : रेल्वे प्लेटफॉर्म सिंगर ते सोशल मीडिया स्टार आणि बॉलिवूड प्लेबॅक सिंगर झालेल्या रानू मंडल यांची सध्या सर्वत्र चर्चा आहे. एकीकडे त्यांच्या टॅलेंटचं कौतुक केलं जात आहे तर दुसरीकडे मात्र रानू यांची मुलगी ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. रानू यांच्या वाईट काळात त्यांच्या मुलीनं त्यांना एकटं टाकलं सर्वांधिक युजर्सचं म्हणणं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार रानू मंडल यांच्या मुलीनं काही वर्षांपूर्वी त्यांना सोडून दिलं होतं. त्यावेळी रानू यांचं वय होतं 50 वर्षं आणि त्यावेळी त्यांच्याकडे पैसे कमावण्याच्या कोणताही पर्याय नव्हता किंवा त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची अशी संपत्ती नव्हती ज्यावर त्या आपली उपजिविका करू शकतील.

काही दिवसांपूर्वी रानू मंडल सोशल मीडियावर फेमस झाल्या आणि त्यानंतर त्यांची दूर गेलेली मुलगी त्यांना भेटायला आली. खरं तर रानू मंडल यांच्या पतीने त्यांना सोडून दिलं होतं. त्यानंतर त्यांच्या दुसऱ्या पतीचं अचानक निधन झालं त्यानंतर त्यांचं कुटुंब म्हणून त्यांच्यासोबत फक्त त्यांची मुलगी होती. मात्र रानाघाटच्या स्थानिय मीडिया रिपोर्टनुसार मागच्या 10 वर्षांपासून रानू एकट्याच राहत होत्या. अशात त्यांनी स्वतःच पोट भरण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गाणं गात भीक मागायला सुरुवात केली.

अभिनेत्री कृति सेनन होणार सरोगसी मदर, ‘मिमी’चा फर्स्ट लुक रिलीज

मात्र याच रेल्वे स्टेशनवर त्यांच्या नशीबाची दारं उघडली. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्या रातोरात स्टार झाल्या. दरम्यान आईला प्रसिद्धी मिळाल्यानंतर 10 वर्षांपूर्वी सोडून गेलेली त्यांची मुलगी त्यांच्याकडे परत आली. पण ती मुलगी सध्या सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. अनेकांनी या मुलीला स्वार्थी म्हणत तिच्यावर टीका केली आहे. जेव्हा रानू यांना मुलीची गरज होती त्यावेळी तिनं आपल्या आईला सोडून दिलं मात्र आता त्यांना प्रसिद्ध मिळाल्यावर मात्र ती आपल्या आईकडे परतल असल्याचं अनेक युजर्सचं म्हणणं आहे.

एकेकाळी 'हँडसम बॉय' असलेला अक्षय खन्ना आता दिसतो असा, PHOTO VIRAL

काही युजर्सनी म्हटलं, रानू चांगल्या दिसत नव्हत्या त्याच्याकडे पैस नव्हते यासाठी त्याच्या मुलीनं त्यांना सोडून दिल्याचं म्हटलं आहे. मात्र या सर्वांवर स्वतः रानू यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांनी फक्त 10 वर्षं त्या एकट्या होत्या ही गोष्ट स्विकारली होती. जेव्हा त्यांची मुलगी त्यांच्याकडे परत आली त्यावेळी त्यांनी तिला प्रेमानं मिठी मारली. रानू सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत आहेत. नुकतंच त्यांनी हिमेश रेशमियासाठी दुसऱ्या एका गाण्याचंही रेकॉर्डिंग केलं. ज्याचा व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे.

'तेरी मेरी कहानी'नंतर हिमेशाच्या सिनेमासाठी रानूनं गायलं दुसरं गाणं, पाहा VIDEO

=============================================================

VIDEO: गणेशोत्सवाच्या 'या' दिवसांत रात्री 12 पर्यंत स्पीकर्सना परवानगी इतर टॉप 18 बातम्या

Published by: Megha Jethe
First published: August 31, 2019, 11:08 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading